नवी दिल्ली : केवळ सामाजिक न्याय प्राप्त करणे पुरेसे नाही तर विविध गटांत सामाजिक सौहार्द असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केरळमधील दलित महानायक अय्यानकली आणि श्री नारायण गुरू यांच्या योगदानाची प्रशंसा करताना मोदींनी हे प्रतिपादन केले. केरळ पुलायर महासभेच्या वतीने आयोजित अय्यानकली यांच्या १५२ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ समानता नको आहे. आम्हाला त्याही पुढे जायचे आहे. अंतिम पडाव हा सामाजिक सौहार्दतेचा आहे. त्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.सौहार्द प्राप्त करण्यासाठी समानता आणि सर्वांना प्रेमभाव यानिशी पावले टाकावी लागतील. आपल्याला स्वउत्थान करावे लागणार आहे आणि त्यातून सर्वजण सौहार्द प्राप्तीसाठी एकत्र येतील. त्याशिवाय समाजात सौहार्द येऊ शकत नाही, असेही मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)
समानता पुरेशी नाही, सामाजिक सौहार्द हवे
By admin | Published: September 09, 2014 4:03 AM