- शीलेश शर्मा, नवी दिल्लीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीचे सरकार राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषम योजना सुरू करण्याचा गांभीर्याने विचार करीत असून पुढील महिन्यात यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ते १५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात आलेल्या सम-विषम योजनेला दिल्लीकर आणि सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे केजरीवाल यांचा उत्साह वाढला आहे. या काळात प्रदूषणाचा स्तर भलेही कमी झाला नसेल पण दिल्लीच्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक जामपासून मात्र येथील लोकांचा मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेला मिळणाऱ्या भरघोस पाठिंब्यामागे हेच मुख्य कारण आहे. निम्म्यावर लोकांचा पाठिंबाताज्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील ५४ टक्के लोकांनी योजनेला पाठिंबा देताना त्याची प्रशंसा केली आहे. तर २१ टक्के नागरिकांनी सम-विषमला विरोध केला आहे. २५ टक्के लोकांनी कुठलेही मत व्यक्त केलेले नाही. दुसरीकडे प्रदूषणात झालेल्या घटाबद्दल वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. हिवाळा नसता तर या योजनेचे ठोस परिणाम समोर आले असते, असा दावा पर्यावरण विशेषज्ञ सुनीता नारायण यांनी केला होता तर प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढले असल्याचा युक्तिवाद अनेक संस्थांनी केला आहे. सम-विषय योजनेमुळे दिल्लीत पेट्रोल, डिझेलच्या वापराचे प्रमाण कमी झाले असल्याचे अन्य एका सर्वेक्षणात सांगण्यात आले. एका पेट्रोल पंपावर दररोज तीन टॅँकर विक्री होत होती. सम-विषममुळे ती दोन टँकरवर आली आहे. एका टँकरमध्ये २० हजार लिटर पेट्रोल असते आणि दिल्लीत हजारो पेट्रोल पंप आहेत. तेव्हा दररोज किती पेट्रोलची बचत होत असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. वाया जाणारअया इंधनाचे प्रमाणही कमी झाले आहे.
सम-विषम योजना दिल्लीत पुन्हा सुरू होणार
By admin | Published: January 17, 2016 2:05 AM