लेह/नवी दिल्ली : विस्तारवादाचा काळ संपला आहे, हे लक्षात ठेवा,असा सज्जड इशारा भारतीय सीमेवरून चीनला देतानाच, आमच्या शत्रूंनी भारतीय सशस्त्रदलांची आग आणि संताप यांचा अनुभव घेतला आहे, असेही चीनला सुनावले.
भारत व चीन यांच्यात लडाखमध्ये सीमेवरून तणाव असतानाच अचानक मोदी यांनी लडाखला भेट दिली. जवानांसमोर बोलताना मोदी यांनी गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन केले. ते म्हणाले की, तुम्हा जवानांचे धाडस व पराक्रमाचे ध्वनी देशाच्या कानाकोपऱ्यांत ऐकायला मिळत आहेत. गलवान खोºयात भारतमातेच्या शत्रूंनी तुमच्यातील आग आणि संताप पाहिला आहे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्हाला कोणी दुबळे समजू नये.
बासरी वाजवणाºया कृष्णाची प्रार्थना करणारे आम्ही आहोत, तसेच सुदर्शन चक्र धारण करणाºया याच कृष्णाची प्रार्थनाही आम्ही करणारे आहोत, असे सांगून मोदी यांनी गलवान खोºयात वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांचा त्यांनी ‘भारतमातेचे अभिमान वाटावेत असे पुत्र’ या शब्दांत गौरव केला. शांतता आणि प्रगतीचे वातावरण विस्कळीत करण्याचा ज्या कोणी यापूर्वी प्रयत्न केला त्याला भारताने नेहमीच चोख प्रत्यूत्तर दिल्याची आठवण मोदी यांनी करून दिली. ते म्हणाले की, आज भारत नौदल, हवाई शक्ती आणि लष्करात शक्तिशाली बनतो आहे. शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण आणि देशाच्या संरक्षण क्षमतेच्या पायाभूत सुविधा अनेक पटींनी वाढवण्यात आल्या आहेत. सशस्त्रदलांच्या गरजांकडे सरकारचे पुरेसे लक्ष आहे.‘तुमच्यावरच देशाचा विश्वास’तुम्ही जवानांनी जे धाडस दाखविले, त्याची जगाने नोंद घेतली आहे. आज तुम्ही ज्या उंचीवर सेवा करत आहात त्यापेक्षाही तुमच्या धाडसाची उंची जास्त आहे. देशाची सुरक्षितता तुमच्या हाती असल्याने देश तुमच्यावर विश्वास ठेवतो.आम्हा सगळ््यांनाच तुमचा अभिमान वाटतो, असे सांगून मोदी म्हणाले की, विस्तारवादी नेहमीच पराभूत वा नष्ट होतात, हा इतिहास आहे. हे युग आहे ते विकासाचे. मोदी यांच्यासोबत चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे होते.परिस्थिती गुंतागुंतीची होऊ देऊ नका - चीनमोदींच्या भेटीनंतर चीनने म्हटले आहे की, सीमेवरील स्थिती गुंतागुंतीची होईल, असे काहीही होता कामा नये. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिएन म्हणाले की, चीन विस्तारवादी असल्याचे म्हणणे निराधार आहे. चीनने त्याच्या १४ पैकी १२ देशांच्या सीमा शांततेने निश्चित केल्या आहेत.‘वंदे मातरम’चा जयघोषमहायुद्धांत किंवा जगात शांतता असताना जगाने आमच्या शूर जवानांचा विजय आणि शांततेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न पाहिले आहेत, असे मोदी म्हणाले तेव्हा ‘वंदे मातरम’ असा जयघोष झाला. देशाच्या सगळ््या भागांतील जे जवान हुतात्मा झाले त्यांनी शौर्याने देशाच्या बलीदानाच्या संस्कृतीचा आदर्शच समोर ठेवला आहे, असे ते म्हणाले.जवानांची विचारपूसमोदी भारतीय जवानांची भेट घेण्यासाठी निमू या सीमेवरील ठाण्याला गेले. निमू झंस्कार रेंजने वेढलेले असून ते सिंधू नदीच्या काठावर आहे. मोदी लष्कराच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन नंतर लष्कर, हवाई दल आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस कर्मचाºयांना भेटले. त्यांनी रुग्णालयात जाऊ न जखमी जवानांची विचारपूसही केली.