बंगळुरु: रेल्वेतील वातानुकूलन यंत्रणा खराब झाल्यामुळे प्रवाशाला झालेल्या मनस्तापाबद्दल त्याला १२ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई देण्याचा आदेश कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिलाआहे. साऊथ वेस्टर्न रेल्वेने ५८वर्षांच्या प्रवाशाला १0 हजाररुपये नुकसानभरपाई व तिकिटाचे दोन हजार रुपये रिफंड म्हणून द्यावेत, असे आयोगाने म्हटले आहे. वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्यामुळे आपल्याला तीन तासांचा प्रवास गुदमरत करावा लागला, अशी प्रवाशाची तक्रार होती.म्हैसूरमध्ये राहणारे डॉ. शेखर एस. बंगळुरूसाठी यांनी ९ मार्च २0१५ रोजी टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेसचे तिकीट काढले होते. म्हैसूर ते बंगळुरु हा तीन तासांचा प्रवास आहे. डॉ. शेखर आपल्या डब्यात पोहोचले, तेव्हा वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब रेल्वेच्या मैकॅनिकला ते कळवले.मेकॅनिकने येऊन ती यंत्रणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे डॉ. शेखर व त्यांच्या डब्यातील अन्य प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. त्यामुळे डॉ. शेखर यांनी रेल्वेकडे यासंबंधी तक्रार करून रिफंडची मागणी केली. आपला प्रवास अत्यंत त्रासदायक होता, असेही त्यांनी तक्रारीत नमूद केले.त्यावर टिपू सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू झाली, तेव्हा वातानुकूलन यंत्रणा सुरू होती आणि बंगळुरू येथे गाडी पोहोचता पोहोचता ती बंद पडली. त्यामुळे ती लगेच दुरुस्त करणे शक्य झाले नाही, असे त्यांना कळविले. त्यामुळे डॉ. शेखर यांनी राज्य ग्राहक मंचाकडे तक्रार केली.ग्राहक मंचाने डॉ. शेखर यांना तीन हजार रुपयांची नुकसानभरपाईआणि दोन हजार रुपये रिफंडदेण्याचा आदेश दिला होता. तसेच प्रत्येक दिवसामागे १00 रुपये दंड ठोठावला. (वृत्तसंस्था)चार आठवड्यांत रक्कम द्याडॉ. शेखर यांनी नुकसानभरपाईची रक्कम कमी असून, ती अधिक असायला हवी, असे सांगत १५ हजार रुपयांची मागणी केली. त्यासाठी त्यांनी कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली.प्रवाशाचे वय आणि त्यांना झालेला त्रास लक्षात घेता आयोगाने त्यांना१0 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश रेल्वेला दिला आहे. चार आठवड्यांत रेल्वेने ही रक्कम डॉ. शेखर यांना द्यावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.
एसी बिघडल्याने प्रवाशाला भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:40 AM