शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

कैरानातील पलायन; भाजपाने केले घूमजाव

By admin | Published: June 15, 2016 4:01 AM

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना पलायनप्रकरणी भाजपाचे खासदार हुकूमसिंग यांनी मंगळवारी अचानक घूमजाव केले. कैरानातील हिंदूंचे पलायन हा ‘सांप्रदायिक’ मुद्दा नाही, तर त्याचा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यातील कैराना पलायनप्रकरणी भाजपाचे खासदार हुकूमसिंग यांनी मंगळवारी अचानक घूमजाव केले. कैरानातील हिंदूंचे पलायन हा ‘सांप्रदायिक’ मुद्दा नाही, तर त्याचा कायदा व सुव्यवस्था परिस्थितीशी अधिक संबंध आहे, असे हुकूमसिंग म्हणाले. पलायन करणाऱ्या कुटुंबांची संख्या ४०० ते ५०० पर्यंत वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.या कुटुंबांनी ‘सांप्रदायिक तणावा’मुळे नव्हे तर ‘आर्थिक कारणां’वरून गाव सोडले असल्याचे शामलीचे जिल्हाधिकारी सुजीत कुमार यांनी स्पष्ट केले. ‘हा सांप्रदायिक स्वरुपाचा मुद्दा नाही. हा हिंदू किंवा मुस्लिमांचाही प्रश्न नाही. त्याचा संबंध कायदा व सुव्यवस्थेशी अधिक आहे,’ असे कैरानाचे खासदार हुकूमसिंग म्हणाले. लोकांना पलायन करण्यास बाध्य करणारा एक आरोपी नाही तर आरोपींची संख्या डझनावर आहे. हे लोक कोण आहेत, हे आरोपींची नावे पाहूनच आपण समजू शकतो, असे याआधी सांगून हुकूमसिंग यांनी या पलायनामागे मुस्लिम सहभागी असल्याचे संकेत दिले होते. कैरानात सांप्रदायिक तणाव नाही. बाबरी मशीद पाडली त्यावेळी आणि मुजफ्फरनगरची दंगल घडली त्यावेळीही कैराना शांत होते. येथील लोकांनी बंधुभावाचा बळकट संदेश देशाला दिला आहे, असे सुजीत कुमार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)