काेराेनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान कर्नाटकमध्ये दरराेज ४० हजार ते १.३ लाख रुग्ण आढळण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने एका गणितीय माॅडेलवरून काढलेल्या अंदाजानुसार फेब्रुवारीमध्ये तिसरी लाट पीक अवर असू शकते.
४०,००० सर्वसामान्य परिस्थितीत, ८०,००० कोरोनाच्या मध्यम लाटेत, १,०३,००० तीव्र लाटेदरम्यान रुग्ण आढळू शकतात. ३ ते ५ टक्के साधारणत: रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
८० ते १२० रुग्णांना दरराेज आयसीयूमध्ये दाखल करावे लागू शकते. या आकडेवारीचा अंदाज घेऊन रुग्णालयांमध्ये सज्जता ठेवायला हवी, असे आराेग्य व कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त डी. रणदीप यांनी सांगितले.
डाॅ. भारती पवार यांनाही काेराेनाचा संसर्गमहाविकास आघाडी सरकारमधील जवळपास १३ मंत्र्यांना संसर्ग झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळातही काेराेनाने शिरकाव केला आहे. केंद्रीय आराेग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांनाही काेराेनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून सध्या गृहविलगीकरणात असल्याची माहिती त्यांनी दिली.