बंगळुरू : कावेरी नदीचे पाणीतामिळनाडूला सोडण्यावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानी बंगळुरूमध्ये १२ तासांच्या बंदची हाक दिली. शाळा, महाविद्यालये उघडली नाहीत. हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होते. आंदोलकांनी तामिळनाडूहून येणाऱ्या बसगाड्याही रोखल्या.१३ सप्टेंबर रोजी कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीडब्ल्यूएमए) एक आदेश जारी करून कर्नाटकने कावेरी नदीतून पुढील १५ दिवस तामिळनाडूला ५ हजार क्युसेक पाणी देण्याचे आदेश दिले होते. कर्नाटकातील शेतकरी संघटना, कन्नड संघटना आणि विरोधी पक्ष या निर्णयाला विरोध करत आहेत. कर्नाटक आणि तामिळनाडूमधील कावेरी नदीशी संबंधित हा वाद १४० वर्षे जुना आहे.
विरोधक राजकारण करत आहेत : मुख्यमंत्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधी पक्ष भाजप आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) कावेरी पाणी वादावर राजकारण करत असल्याचा आरोप म्हैसूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले, तामिळनाडूच्या लोकांनी १२,५०० क्युसेक पाणी मागितले आहे. परंतु, सध्या आम्ही ५,००० क्युसेक पाणी सोडण्याच्या स्थितीत नाही.
बंगळुरूत जमावबंदीबंद दरम्यान तामिळनाडू - कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी बंगळुरूमध्ये कलम १४४ (जमावबंदी) लागू केली आहे.