शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे झाली तरी देशद्रोहाच्या कायद्याची गरज आहे का?; सरन्यायाधीशांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 05:47 IST

केंद्र सरकारचे मत मागविले, जारी केली नोटीस. देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका करण्यात आली आहे दाखल.

ठळक मुद्देकेंद्र सरकारचे मत मागविले, जारी केली नोटीस.देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका करण्यात आली आहे दाखल.

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांचा आवाज दडपण्यासाठी ब्रिटिशांनी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला होता. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असून अजूनही या वसाहतवादी कायद्याची आवश्यकता आहे का असा सवाल सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी केंद्र सरकारला केला. या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे मत मागविले असून तशी नोटीसही जारी केली.

देशद्रोहविषयक कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी नवी याचिका दाखल झाली आहे. तिच्या सुनावणीप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशद्रोहाचा कायदा म्हणजे सुताराच्या हातात करवत देण्यासारखे आहे. तो त्या हत्याराने सारे जंगलच कापून टाकेल. तशाच रीतीने देशद्रोहाच्या कायद्याचाही गैरवापर होण्याची शक्यता आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ अन्वये देशद्रोहाचा गुन्हा नोंदविला आहे असे ऐकताच संबंधित आरोपी भयभीत होतो. या कायद्याचा वापर करणाऱ्या यंत्रणांच्या उत्तरदायित्वाचाही मुद्दा महत्त्वाचा आहे. 

देशद्रोहाच्या कायद्यामुळे विचार व भाषण स्वातंत्र्य या मूलभूत हक्कांवर गदा येते असे निवृत्त मेजर जनरल एस. जी. वोम्बटकेरे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) द्वारे प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या विचार स्वातंत्र्याचा देशद्रोही कायद्यामुळे संकोच होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा रद्द व्हायला पाहिजे. भारतीय दंड संहितेच्या कलम १२४-अ बद्दल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सध्याचा काळ व कायद्याचा विकास या दोन्ही गोष्टींचा विचार करावा. याआधी देशद्रोहाच्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला दोन पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या वेगळ्या खंडपीठाने केंद्राकडे या कायद्याबद्दलचे मत मागविले होते. 

लोकमान्य टिळकांवरही उगारला होता बडगासर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, देशातील स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी ब्रिटिशांनी देशद्रोहाच्या कायद्याचा वापर केला. लोकमान्य टिळकांपासून अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या विरोधात ब्रिटिश सरकारने या कायद्याचा बडगा उगारला होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयGovernmentसरकारN V Ramanaएन. व्ही. रमणाLokmanya Tilakलोकमान्य टिळक