नाराजीनंतरही भाजप देईना भाव, वरून गांधी काँग्रेसच्या मार्गावर जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:38 AM2021-10-11T09:38:01+5:302021-10-11T09:38:56+5:30
वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे.
नवी दिल्ली - भाजप खासदार वरुण गांधी (varun gandhi) आणि पक्षातील अंतर वाढताना दिसत आहे. कधी काळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेल्या वरुण गांधींकडे गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांना ना पक्षात महत्वाची जागा मिळत आहे, ना केंद्र सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. आता लखीमपूर खेरी प्रकरणाबरोबरच, भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निर्मिती तर वरुण यांच्या नाराजीचे कारण नाही? अशी चर्चा राकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वरुण गांधी आणि मेनका गांधी दोघांनाही स्थान मिळालेले नाही. यापूर्वी हे दोन्ही नेते यात होते. असेही नवी कार्यकारिणी तयार करताना 25 ते 30 टक्के सदस्य बदले जातातच आणि यावेळीही भाजपने अनेक मुख्य चेहरे बदलले आहेत.
वरुण गांधी आणि त्यांची आई मेनका गांधी यांचा संबंध गांधी कुटुंबाशी आहे. यामुळेच त्यांचा हटविण्यात आल्याची चर्चा आहे. खरे तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मेनका गांधी यांना मंत्री करण्यात आले नाही. तेव्हापासूनच हा दुरावा दिसू लागला आहे. वरुण गांधीही संघटनेच्या कामातही अधिक रस घेत नव्हते. एवढेच नाही, तर नुकतेच आपण कार्यकारिणीमध्ये होतो, की नाही हेही आपल्याला माहीत नाही, हे त्यांचे वक्तव्यही चर्चेचा विषय बनले होते.
आता उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक जवळ आली असतानाच, वरून गांधी यांची विधाने भाजपला अस्वस्थ करणारी आहेत. मात्र, असे असले तरी भाजपही वरूण गांधी यांच्या वक्तव्यांना फारशी किंमत देताना दिसत नाही. त्यांच्या कुठल्याही वक्तव्यावर प्रतिक्रियाही दिली जात नाही. यावरून स्पष्ट आहे, की भाजप वरून गांधी यांना फारसे गांभीर्याने घेत नाही.