शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सर्जिकलनंतरही खो-यात अतिरेक्यांचे थैमान, हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 2:26 AM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या वर्षी भारताच्या लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात मृत्यू होण्याचे प्रमाण ३१ टक्क्यांनी वाढले आहे. नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट फॉर कॉनफ्लिक्ट मॅनेजमेंटच्या वतीने चालवल्या जात असलेल्या साऊथ अशिया टेररिझम पोर्टलच्या (एसएटीपी) माहितीचे इंडियास्पेन्डने केलेल्या विश्लेषणात म्हटले आहे की, दहशतवादाशी संबंधित मृत्यू २०१५-२०१६मध्ये २४६ होते तर २०१६-२०१७मध्ये (२४ सप्टेंबर २०१७पर्यंत) ३२३ होते.याचाच अर्थ असा की, सर्जिकल स्ट्राइक्सनंतर जम्मू आणिकाश्मीरमध्ये घुसखोरी व दहशतवादी हल्ले याचे प्रमाण कमी झाले नसून, त्यात वाढच झाली आहे. लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी गरज भासली तर आणखी सर्जिकल स्ट्राइक्स होऊ शकतात, असे संकेत मध्यंतरी दिले. पण त्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही.आम्हाला काय म्हणायचे आहे याचा संदेश सर्जिकल स्ट्राइकद्वारे त्यांना दिला गेला आणि तो त्यांना समजलाही, असे रावत २५ सप्टेंबर २०१७ रोजी म्हणाले होते. रावत म्हणाले होते की, ‘‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण छावण्या सुरूच असल्यामुळे भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे.’’प्रसारमाध्यमांतील वृत्तान्तांवरून एसएटीपीने ही मृत्यूबद्दलची माहिती गोळा केली असून, ती २४ सप्टेंबरपर्यंतची आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना ठार मारण्याच्या प्रमाणात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१५-२०१६मध्ये १५७ दहशतवादी ठार मारले होते तर १९४ जणांना २०१६-२०१७मध्ये ठार मारण्यात आले.- दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात सुरक्षा दलांचे जवान मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण २०१५-२०१६मध्ये ७० होते तर २०१६-२०१७मध्ये ७७ जवान ठार झाले. दहशतवादाशी संबंधित हिंसाचारात नागरिक मरण पावण्याचे प्रमाण २०१६-२०१७मध्ये ५२ होते तर २०१५-२०१६मध्ये १० नागरिक ठार झाले होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्कर