शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

दृष्टी गेली तरी तेवत ठेवले ज्ञानाचे अग्निहोत्र; महापंडित जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 7:28 AM

२०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे.

नवी दिल्ली : २०२३ सालासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेले जगद्‌गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत महापंडित असून त्यांनी आजवर अनमोल अशी साहित्यसेवा केली आहे. ते दोन महिन्यांचे असताना दुर्दैवाने दृष्टिहीन झाले, पण त्याने खचून न जाता त्यांनी आयुष्यभर ज्ञानाचे अग्निहोत्र सतत तेवत ठेवले आहे. संस्कृत भाषेच्या शिक्षणातून त्यांनी भारतीय संस्कृतीची मूल्ये सर्व जगाला समजावून सांगण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे राहणारे जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांचा जन्म १९५० साली झाला. ते रामानंद संप्रदायाचे असून त्यांनी चित्रकूट येथे संत तुलसीदास यांच्या नावे तुलसी पीठ या धार्मिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. ते सध्या या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या जगद्‌गुरू रामभद्राचार्य विकलांग विश्वविद्यालयात दिव्यांग विद्यार्थ्यांनाच शिक्षण दिले जाते. तिथे त्यांच्यासाठी पदवी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.

अफाट स्मरणशक्तीची मिळाली देणगी

• जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांचे मूळ नाव गिरिधर मिश्र असून त्यांनी जौनपूर येथील आदर्श गौरीशंकर संस्कृत महाविद्यालयात औपचारिक शिक्षण घेतले आहे.

■ तिथे त्यांनी संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, इतिहास या विषयांचा अभ्यास केला. एकदा गोष्ट ऐकली की, ती कायमची लक्षात ठेवण्याची अफाट स्मरणशक्ती त्यांना लाभली आहे.

त्यामुळे ते कधीही ब्रेल लिपी शिकले नाहीत किंवा लेखनासाठी अन्य साधनांचा आधार घेतला नाही. जे शिकले ते त्यांनी लक्षात ठेवले व त्याआधारे अनेक पुस्तकेही लिहिली.

ईश्वराच्या सगुण, निर्गुण रुपाबद्दल केले विवेचन

संयुक्त राष्ट्रांच्या वतीने आयोजित विश्व शांती शिखर संमेलनात जगद्गुरू रामभद्राचार्य यांचा समावेश होता. भारत व हिंदू या शब्दांची संस्कृत व्याख्या तसेच ईश्वराचे सगुण, निर्गुण रूप या मुद्द्यांविषयी त्यांनी या संमेलनातील आपल्या भाषणात विवेचन केले होते.

शंभरावर पुस्तके लिहिली

• जगद्‌गुरु रामभद्राचार्य हे २२ भाषांमध्ये पारंगत आहेत. त्यांनी संस्कृत. हिंदी, अवधी, मैथिलीसहित अनेक भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच १०० हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

त्यामध्ये चार महाकाव्य (दोन संस्कृत व 3 दोन हिंदी भाषेतील), रामचरितमानसवर हिंदीतून केलेले भाष्य, अष्टाध्यायीबाबत काव्यात्मक संस्कृत ग्रंथ, प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, प्रधान उपनिषदांवर संस्कृतमधून केलेले विवेचन) अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.

संत तुलसीदास यांच्या काव्यावर ● अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये जगद्‌गुरू रामभद्राचार्य अग्रस्थानी आहेत. रामायण, महाभारतावरील रामभद्राचार्याच्या निरुपणाचे कार्यक्रम भारतातील अनेक देशांत तसेच विदेशांतही आयोजिण्यात आले होते.

● तसेच त्यांच्या निरुपणाचे कार्यक्रम विविध वाहिन्यांवरही प्रसारित होत असतात. त्यांना २०१५ साली केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.