आमदार येण्यापूर्वीच महानगर भाजपाचा जल्लोष सुरेश भोळे यांनी व्यक्त केली नाराजी : खच्चीकरण केले जात असल्याचा केला आरोप
By admin | Published: May 23, 2016 12:41 AM
जळगाव : महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना दाऊदशी संपर्कात असल्याच्या आरोपात क्लिनचिट मिळाल्याचा आनंदोत्सव रविवारी भाजपातर्फे जिल्हाभरात साजरा झाला. मात्र महानगर भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे यांनी अन्य कार्यक्रमात असल्याने पाच-दहा मिनिटांत येत असल्याचे कळवूनही वाट न पाहता आनंदोत्सव साजरा केल्याने आमदार चिडले. जिल्हाध्यक्षांसमोरच माजी महानगराध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
जळगाव : महसूलमंत्री तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना दाऊदशी संपर्कात असल्याच्या आरोपात क्लिनचिट मिळाल्याचा आनंदोत्सव रविवारी भाजपातर्फे जिल्हाभरात साजरा झाला. मात्र महानगर भाजपातर्फे आमदार सुरेश भोळे यांनी अन्य कार्यक्रमात असल्याने पाच-दहा मिनिटांत येत असल्याचे कळवूनही वाट न पाहता आनंदोत्सव साजरा केल्याने आमदार चिडले. जिल्हाध्यक्षांसमोरच माजी महानगराध्यक्षांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पालकमंत्री खडसेंना क्लिनचिट मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्षांसह सर्व शहरातील कार्यकर्ते भाजपा कार्यालयात सकाळी १० वाजता एकत्र जमले व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करणार होते. महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांना उशीर होणार असल्याने कार्यक्रमाची वेळ अर्धातास लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आमदार भोळे हे एका कार्यक्रमात असल्याने त्यांनी पाच-दहा मिनिटांत येतो असे कळविले. मात्र जिल्हाध्यक्ष उदय वाघ, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर अशोक लाडवंजारी व महानगर भाजपातील कार्यकर्ते पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठीही निघून गेले. त्यानंतर आमदार भोळे भाजप कार्यालयात पोहोचले. आपली प्रतीक्षा न करताच कार्यक्रम आटोपून टाकल्याचे पाहून ते चिडले. लाडवंजारी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच तेथे उपस्थित जिल्हाध्यक्ष वाघ यांनाही आपले खच्चीकरण केले जात असल्याची नाराजी व्यक्त केली. -------तुम्हालाच कार्यकर्ते सांभाळता येत नाहीआमदार भोळे यांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासमोरच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप केला. त्यावर वाघ यांनी तुम्हालाच कार्यकर्ते सांभाळता येत नसल्याचे सुनावले. --------असा कोणताही प्रकार माझ्यासमोर घडलेला नाही. सर्व कार्यकर्ते एक झाले आहेत. भाजपा एक आहे. सर्वांचे नेते एकनाथराव खडसे हेच आहेत. मोठा पक्ष असल्याने प्रत्येकाची मते वेगळी असली तरीही मतभेद नाहीत. -उदय वाघ,जिल्हाध्यक्ष, भाजपाब्रााणसभेत कार्यक्रम होता. तेथून भाजप कार्यालयात जाण्यास उशीर झाला. मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तसेच नाराजीही व्यक्त केलेली नाही.-सुरेश भोळे,आमदार, भाजपा