दुबईपेक्षाही जबरदस्त! ऑटोरिक्षावाल्याचे नशीब फिरले, रातोरात २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 11:10 PM2022-09-18T23:10:30+5:302022-09-18T23:10:49+5:30

गेल्या वर्षीची ओनमची बंपर लॉटरीही एका ऑटो-रिक्षाचालकाने जिंकली होती.ऑटो रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणे कठीण बनले होते. यामुळे तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता.

Even more amazing than Dubai! An kerala autorickshaw driver won a Onam lottery worth Rs 25 crore overnight | दुबईपेक्षाही जबरदस्त! ऑटोरिक्षावाल्याचे नशीब फिरले, रातोरात २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकला

दुबईपेक्षाही जबरदस्त! ऑटोरिक्षावाल्याचे नशीब फिरले, रातोरात २५ कोटी रुपयांची लॉटरी जिंकला

googlenewsNext

सध्या ऑटो रिक्षा चालकांचे अच्छे दिन आले आहेत. केरळच्या एका ऑटो रिक्षा चालकाला रातोरात लॉटरी लागली आहे. थोडी थोडकी नाही तर थेट २५ कोटींची लॉटरी या रिक्षा चालकाला लागली आहे. त्याचाही यावर विश्वास बसत नाहीय. ओनम सणामध्ये ओनम लॉटरीचे आयोजन केले जाते. त्यात तो जिंकला आहे. 

श्रीवराहमच्या अनुप याला ही लॉटरी लागली आहे. ऑटो रिक्षा चालवून संसाराचा गाडा हाकणे कठीण बनले होते. यामुळे तो मलेशियाला कुकची नोकरी करण्यासाठी जाणार होता. त्यासाठी त्याने एक दिवस आधीच तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशीच त्याचे नशीब बदलले आणि तो रातोरात करोडपती झाला. 

शनिवारी त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकिट त्याची पहिली पसंत नव्हते, त्याच तिकिटाने अनुपला छप्परफाड पैसा दिला आहे. ही लॉटरी लागल्यानंतर त्याने मलेशियाला जायची आता गरज उरली नाही, असे सांगितले आहे. पहिले तिकीट त्याला आवडले नव्हते, म्हणून त्याने दुसरे तिकिट खरेदी केले, या दुसऱ्या तिकिटाने त्याला जिंकवले आहे. आता मला कर्ज घेण्याची गरज नाही, तसेच मलेशियालाही जायची गरज नाही असे तो म्हणाला. 

तो गेल्या 22 वर्षांपासून या लॉटरीची तिकिटे खरेदी करत होता. या काळता त्याला आतापर्यंत काहीशे रुपयांपासून जास्तीत जास्त पाच हजार रुपये मिळाले होते. "मला जिंकण्याची अपेक्षा नव्हती, म्हणून मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहिला नाही. पण जेव्हा मी माझा फोन पाहिला तेव्हा मला समजले की मी जिंकलो. माझा विश्वासच बसत नव्हता आणि मी तो मेसेज माझ्या पत्नीला दाखविला." असे तो म्हणाला. 

एवढी लॉटरी जिंकली तरी अनुपला शंका होती. 'मला तरीही शंका होती म्हणून मी लॉटरी विकणाऱ्या महिलेला तिकिटाचा फोटो पाठवला. तिनेही तो बंपर लॉटरीचा क्रमांक असल्याचे सांगितले.' जिंकलेल्या पैशातून कर भरल्यानंतर अनूपला सुमारे 15 कोटी रुपये मिळतील. तो या पैशातून आपले घर बांधणार आहे आणि त्याच्यावर जे काही कर्ज आहे ते फेडणार आहे, असे अनुप म्हणाला. 

गेल्या वर्षीची ओणमची बंपर लॉटरीही एका ऑटो-रिक्षाचालकाने जिंकली होती. कोचीजवळील मराडू येथील ऑटो-रिक्षा चालक जयपालन पीआर यांना त्यावेळी 12 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.

Web Title: Even more amazing than Dubai! An kerala autorickshaw driver won a Onam lottery worth Rs 25 crore overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.