शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

तेव्हाचेही पंतप्रधान मणिपूरला गेले नव्हते; गृहमंत्री अमित शाह यांनी विराेधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 6:14 AM

मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव, इंद्रकुमार गुजराल यांच्या कार्यकाळात तसेच यूपीएचे सरकार असताना मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. तेव्हा त्यावेळच्या पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत कोणतेही निवेदन केले नव्हते. तेव्हाही कोणीही पंतप्रधान मणिपूरमध्ये गेले नव्हते असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 

अमित शाह म्हणाले की, मणिपूरमधील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप दु:खी झाले. हिंसाचार सुरू झाला त्या दिवशी पहाटे चार वाजता मोदी यांनी मला फोन करून सर्व घटनेची माहिती घेतली. मी स्वत: तीन दिवस मणिपूरला गेलो होतो. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय २३ दिवस त्या राज्यात तळ ठोकून होते. मणिपूरच्या राज्य सरकारने हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला संपूर्ण सहकार्य देऊ केले. त्यामुळे सरकार बरखास्तीसाठी असलेले कलम ३५६ वापरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अमित शाह यांनी सांगितले की, केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे.

यूपीएने केला भ्रष्ट मार्गाचा अवलंबअमित शाह म्हणाले की, आपले सरकार काहीही करून वाचविण्यासाठी यूपीएने भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केला. १९९३ साली काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारवर अविश्वास ठराव आला असता काँग्रेसने गैरमार्गांचा अवलंब करून ते सरकार टिकविले. नरसिंहराव सरकारविरोधी अविश्वास ठराव फेटाळला गेला; पण झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना तुरुंगात जावे लागले. नरसिंहराव यांनाही तुरुंगात जावे लागले. आता तीच काँग्रेस व झामुमाे एकत्र बसले आहेत. 

‘राहुल गांधी यांचे झाले १३ वेळा लाँचिंग’राहुल गांधी यांचे नाव न घेता अमित शाह यांनी सांगितले की, काँग्रेसच्या एका नेत्याचे आतापर्यंत १३वेळा राजकारणात लाँचिंग करण्यात आले आहे. कलावती नावाच्या महिलेच्या घरी राहुल गांधी जेवून आले. त्या महिलेला राहण्यासाठी पक्के घर, स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मोदी सरकारने दिली आहे असेही शाह म्हणाले.

राहुल गांधी म्हणजे भारत नाहीमणिपूर हा वेगळा झाला नसून तो देशाचा अविभाज्य भाग आहे आणि ताे भारताचाच भाग राहिल. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली आहे असे वक्तव्य भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये  प्रथमच कोणीतरी केले व त्या वक्तव्यावर काँग्रेसच्या सदस्यांनी बाके वाजविली. राहुल, तुम्ही म्हणजे भारत देश नाही हे लक्षात ठेवा.  लक्षात ठेवा नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत.    - स्मृती इराणी, महिला     व बालकल्याण मंत्री 

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNo Confidence motionअविश्वास ठराव