सलग दुसर्या दिवशी भरदिवसा घरफोडी अशोका अपार्टमेंटमधील घटना : सव्वा लाखाचा मुद्देमाल लांबविला
By admin | Published: January 22, 2016 10:41 PM
जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून शुक्रवारीही भरदिवसा दुपारी तीन ते दोन या वेळात दंगलग्रस्त कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर राहणार्या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची हिर्याची अंगठी, ३२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पंधरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम झुमके असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.
जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले असून शुक्रवारीही भरदिवसा दुपारी तीन ते दोन या वेळात दंगलग्रस्त कॉलनीत अशोक अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर राहणार्या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची हिर्याची अंगठी, ३२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पंधरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम झुमके असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.आकाशवाणी ते सिंधी कॉलनी दरम्यान असलेल्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाजवळ पालखी हॉटेलसमोर अशोका अपार्टमेंट आहे. हा परिसर अतिशय उच्चभ्रू मानला जातो.जरीना बोहरा या सागर हायस्कूलमध्ये शिक्षिका असल्याने सकाळी अकरा वाजताच घरातून बाहेर पडल्या होत्या तर पती सजाद हुसेन बोहरा हे गॅसचे काम करतात. दुपारी तीन वाजता ते घरातून बाहेर गेले होते. संध्याकाळी साडेपाच वाजता पत्नीला घेऊन घरी आले असता घराचे कुलूप तुटलेले होते तर घरात कपाटही उघडे होते व सामान अस्ताव्यस्त पडलेला होता.श्वान पथकाला पाचारणघरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर जरीना बोहरा यांनी ही घटना पोलिसांना कळविली. अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा पेठचे निरीक्षक श्याम तरवाडकर, गुन्हे शाखेचे राजू मेंढे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण, दिलीप पाटील, भटू नेरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूला चौकशी केली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यापूर्वीही झाली होती चोरीयाच अपार्टमेंटमध्ये वर्षभरापूर्वी डी.एस.कुळकर्णी यांच्या घरातही चोरी झाली होती तर जरीना यांचीही दुचाकी सहा महिन्यापूर्वी चोरी झालेली आहे. आजची ही तिसरी घटना आहे. या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षकही नाहीत व सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आलेले नाहीत.टॅमीने तोडला कडी कोयंडालोखंडी टॅमीने कडी कोयंडा तोडण्यात आला आहे. चोरीनंतर चोरटे ही टॅमी जागेवरच सोडून गेले आहेत. विशेष म्हणजे हॉलमध्ये असलेल्या कपाटातून रोख रक्कम व दागिने चोरी झाले आहेत. कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलेले पाच हजार रुपयेही लांबविण्यात आले, मात्र शेजारी असलेल्या बेडरुमध्ये चोरी बेंटेक्सचे दागिने जैसे थे आहेत. चोरट्यांनी त्यांना स्पर्शही केलेला नाही. मुक्ताईनगरात गुरुवारी झालेल्या चोरीची तीच पध्दत येथे वापरण्यात आली आहे.