ऑनलाइन लोकमत
शारजा, दि.12- जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या ‘बुर्ज खलिफा’मध्ये एका भारतीय व्यावसायिकाचे तब्बल 22 फ्लॅट आहेत. जॉर्ज व्ही नेरियापाराम्बिल असं त्यांचं नाव असून केरळमध्ये त्यांचा जन्म झाला आहे.
‘बुर्ज खलिफा'च्या 49 व्या मजल्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले मी स्वप्न पाहणारा आणि पाहिलेली स्वप्न पूर्ण करणारा माणूस आहे. त्यामुळे मी स्वप्न पाहणे कधीही थांबवत नाही. मला या इमारतीत परवडणा-या किंमतीत जर का फ्लॅट मिळाले तर मी आणखी फ्लॅट विकत घेईल.
मेकॅनिक म्हणून सुरुवात केलेल्या नेरियापाराम्बिल यांनी 1976 मध्ये दुबई गाठून जीईओ नावाची कंपनी एसीची कंपनी सुरू केली. तुम्हाला ‘बुर्ज खलिफा'मध्ये प्रवेशही मिळणार नाही असं म्हणत एका नातेवाईकाने माझी थट्टा उडवली होती. त्यापासून मला प्रेरणा मिळाली . त्यानंतर प्रथम ‘बुर्ज खलिफा'त भाड्याने फ्लॅट घेतला आणि आता 6 वर्षानंतर माझे स्वतःचे 22 फ्लॅट आहेत असं ते म्हणाले.
या इमारतीत एकूण 900 फ्लॅट आहेत त्यापैकी 22 फ्लॅट नेरियापाराम्बिल यांचे आहेत. त्यापैकी 5 फ्लॅट त्यांनी भाड्याने दिले असून, इतर फ्लॅटसाठी भाडेकरुंचा शोध सुरू आहे असं ते म्हणाले.