एव्हरेस्टची बातमी
By admin | Published: August 12, 2015 12:35 AM
एव्हरेस्टवर पाऊल टाकणारे
एव्हरेस्टवर पाऊल टाकणारेसगळ्यात छोटे भाऊ व बहीण--------------काठमांडू : कंदर्प शर्मा (५ वर्षे १० महिने) आणि त्याची बहीण ऋत्विका शर्मा (८ वर्षे ११ महिने) या भावंडांच्या नावाने जगातील सवार्ेच्च शिखर एव्हरेस्ट चढून जाणारे सगळ्यात छोटे गिर्यारोहक असा नवा विक्रम नोंदला जाईल, असे दिसते. नेपाळच्या उत्तरपूर्वेकडील ५,३८० मीटर उंचीवरील एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर हे दोघे सोमवारी यशस्वीपणे परतले. ही माहिती अरुण ट्रेक्स अँड एक्स्पिडिशनचे महाव्यवस्थापक थुपदेन शेर्पा यांनी दिली. या भावंडांची ही मोहीम अरुण ट्रेक्सनेच आयोजित केली होती. या मुलांसोबत बेस कॅम्पवर त्यांचे पालकही होते. बेस कॅम्पवर वैयक्तिक पातळीवर यशस्वीपणे परतणारे वयाने सगळ्यात तरुण असा विक्रम नावावर लागलेले भाऊ व बहीण म्हणूनही त्यांच्या नावावर विक्रम नोंदला गेला आहे. एव्हरेस्टवर पहिले पाऊल कंदर्पने टाकले व नंतर चौथ्या क्रमांकावर ऋत्विकाने. हे शर्मा कुटुंब ८,८४८ मीटर उंचीच्या एव्हरेस्टच्या बेस कॅ म्पवर पोहोचणारे पहिले कुटुंब ठरले आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरच्या लिटिल एंजल्स हायस्कूलमध्ये कंदर्प आणि ऋत्विका शिकतात. गेल्या वर्षीही हर्षित हा भारतीय मुलगा (५ वर्षे ११ महिने) बेस कॅम्पवर गेला होता व त्याने तसा विक्रम केला होता.