- हर्षवर्धन आर्यअहमदाबाद : गुजरात निवडणुकीसाठी भाजपाने ८० विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. भाजपाने दर निवडणुकीत ५० टक्के नवे चेहरे देण्याचा मोदी यांचा फॉर्म्युला सुरूच ठेवला आहे. पक्षाने ३५ विद्यमान आमदारांची तिकिटे कापताना एकाही मुस्लीम व ख्रिश्चनाला तिकीट दिलेले नाही.ओबीसी, पाटीदार व दलित समुदायाने काँग्रेसला साथ देण्याची घोषणा केली आहे. तो प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाने ओबीसींना ५३ जागांवर उमेदवारी दिली आहे. पाटीदार समुदायाचे ५१ आणि दलित समुदायाचे १३ उमेदवार दिले आहेत. भाजपाच्या १८२ उमेदवारांत ११७ ओबीसी, पाटीदार आणि दलित आहेत. आदिवासी व क्षत्रिय यांनाही आपलेसे करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आदिवासींना २७, तर क्षत्रियांना भाजपाने १७ जागांवर उमेदवारी दिली आहे. ब्राह्मणांना ९, जैन-वैश्य यांना ५, मराठी १, तर कायस्थ १, सिंधी १ व लोहाणा १ अशी उमेदवारी दिली आहे. तीन तिकिटे अन्य समुदायाला दिली आहेत.हायप्रोफाइल जागा : भाजपाच्या हायप्रोफाइल जागांमध्ये राजकोट पश्चिममधून मुख्यमंत्री विजय रुपानी, भावनगर पश्चिममधून प्रदेशाध्यक्षजितू वाघानी, मेहसाणामधून उपमुख्यमंत्री नितीन पटेल, जामनगर दक्षिणमधून माजी प्रदेशाध्यक्ष आर.सी. फलदू यांना उमेदवारी दिली आहे.दलबदलूंनाही संधीभाजपाने १२ महिलांना मैदानात उतरविले आहे. यात तेजश्रीबेन पटेल, संगीता पटेल, मनीषा वकील, सीमाबेन मोहिले आदींचा समावेश आहे. काँग्रेसमधून आलेल्या १४ पैकी ८ आमदारांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जीएसटीचे वर्णन ‘गब्बर सिंग टॅक्स’ असे केल्यानंतर गुजरातचे काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी त्याच पद्धतीने प्रचार करीत आहेत. सूरतमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर गब्बर सिंग आणि त्याचे डाकू दाखवणारी मिरवणूकच काढली. त्यात घोडे, खोट्या बंदुका, जीप यांचा वापर केला होता. त्या मिरवणुकीला पोलिसांची परवानगी मिळणार नाही, हे माहीत असल्याने हे कार्यकर्ते ती मागायलाच गेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले. बंदुका दाखवून ते लोकांत भीती निर्माण करीत असल्याचा गु्न्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला.जीएसटीवर टीका करणा-या काँग्र्रेसला मोदींनी केले लक्ष्यमोरबी (गुजरात) : जीएसटीला ‘गब्बर सिंग टॅक्स’ संबोधणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून लुटणारेच दरोडेखोरीचा विचार करू शकतात, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली. काँग्रेस अगदी हातपंप योजनांचे श्रेय घेत आहे, असे सांगून ते म्हणाले की, भाजपाने नर्मदा प्रकल्पासारख्या योजना आणल्या. राहुल गांधी यांनी ‘शोले’ चित्रपटातील खलनायकाची आठवण देत वस्तू व सेवाकर (जीएसटी) म्हणजे ‘गब्बर सिंग टॅक्स’ असल्याचे सांगितले होते. मोदी म्हणाले की, काँग्रेसचे विकास मॉडेलहातपंप देणे हे आहे, तर भाजपाची ‘साउनी’ योजना म्हणजे, सौराष्ट्रासाठी नर्मदा जल योजना आहे.२२ सालों का हिसाब, गुजरात माँगे जवाब;नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना भाजपाच्या आश्वासनांचे काय झाले, असा सवाल केला. गुजरातमधील २२ वर्षांच्या सरकारचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी टिष्ट्वट केले आहे की, २२ सालों का हिसाब, गुजरात माँगे जवाब. गुजराती नागरिकांना घरे देण्यासाठी आणखी ४५ वर्षे लागणार आहेत काय? असा सवाल करून ते म्हणाले की, मोदी यांनी २०१२ मध्ये आश्वासन दिले होते की, ५० लाख नवे घरे दिले जातील. पाच वर्षांत बनविले ४.७२ लाख घरे. हे आश्वासन पूर्ण करण्यास ४५ वर्षे लागणार आहेत काय?
भाजपाचे प्रत्येक तिकीट जातीच्या नावे; जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा!, ओबीसी, पाटीदार, आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 2:00 AM