शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

देशात दर चार मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 4:02 AM

देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई : देशात दर ४ मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याचेही महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने प्रकाशित केलेल्या ‘अ‍ॅक्सिडेंट इंडिया २०१६’ या अहवालातून समोर आले आहे.या अहवालानुसार, मुंबईत रोज ४ हजार छोटे-मोठे रस्ते अपघात होतात. देशात १,५६८.७२ किलोमीटरचे राज्य महामार्ग, तर २३२.५८ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आहेत. राज्यात १ हजार २१० अपघातस्थळे असून त्यातील सर्वाधिक मुंबईत असून त्याखालोखाल नाशिक विभागात अपघातप्रवण स्थळांची संख्या अधिक आहे. मुळात रस्ते वाहतुकीत होणाऱ्या सर्व अपघातांची नोंदणी नॅशनल क्राइम रेकॉडर््स ब्युरोकडून केली जात नाही, तसेच मृत्यूंच्या नेमक्या कारणाचा मृत्यूशी संबंधित आकडेवारीमध्ये अभाव असल्याने ट्रॉमाशी संबंधित मृत्यूंची नेमकी संख्या ओळखणे अवघड असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.जगात होणाºया एकूण ट्रॉमा मृत्यूंपैकी पाव टक्का मृत्यू भारतात होतात. तर गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात रस्ते अपघातांत अंदाजे दोन लाख लोक जखमी झाले आहेत. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ट्रॉमॅटिक ब्रेन-इंज्युरीचे (टीबीआय) मुख्य कारण रस्ते वाहतुकीत होणारे अपघात असल्याचे अभ्यासातून दिसून येते. डॉ. नितीन जगसिया यांनी सांगितले की, अपोलो रुग्णालयातील आपत्कालीन विभागात प्रत्येक महिन्याला सरासरी ७ हजार २०० रुग्ण दाखल होत असून त्यात सर्वाधिक संख्या ही डोक्याला मार लागलेल्या रुग्णांची असते. ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरींमुळे शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक भारही रुग्णांना सोसावा लागतो. ‘गोल्डन अवर’ दरम्यान किंवा दुखापतीनंतर पहिल्या तासामध्ये तातडीने व प्रभावी वैद्यकीय मदत मिळणे उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते.