ऑनलाइन लोकमत
- हा ७० वा स्वातंत्र्यदिन नवा संकल्प घेऊन आला आहे.
- अगणित महापुरूषांनी, क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे आपण आज हा दिवस पाहू शकत आहोत.
- भारताचं वय ७० वर्ष नाही. हजारो वर्ष जुना आपला समृद्ध इतिहास असून आपल्याला भीमपासून भीमराव यांच्यापर्यंत अनेक महान व्यक्तींची परंपरा लाभली आहे.
- पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, महात्मा गांधी, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी केले स्मरण. -आपल्या स्वराज्याचा सुराज्यात परिवर्तन करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून सुराज्य बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- आपल्या देशात अनेकविध समस्या असल्या तरी आपल्याकडे सव्वाशे कोटी देशवासियांची शक्तीही आहे. प्रत्येकाने आपापला भार उचलून या समस्यांशी लढा देऊन देशाला सुराज्य बनवले पाहिजे.
- एक काळ असा होता जेव्हा सरकार अनेक आरोपांनी घेरलं गेलं होतं. मात्र आमचं सरकार अपेक्षांनी घेरलेलं आहे.
- गेल्या दोन वर्षांत अनेक चांगली काम केली. कामं करण्यासाठी नियत आणि जबाबदारीची जाणीव हवी. चांगल्या कारभारासाठी सरकारने संवेदनशील असणे गरजेचे आहे.
- आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर व्यवस्थेत अनेक सकारात्मक बदल झाले.
- गेल्या २ वर्षात सरकारनं एवढी असंख्य कामं केली आहेत, की त्याचा पाढा वाचायचा म्हटलं तर लाल किल्ल्यावरुन मला आठवडाभर बोलत बसावं लागेल.
- तंत्रज्ञानाच्या जोरावर आज एका मिनिटात 15 हजार रेल्वे तिकीट मिळणं शक्य झालं आहे. केवळ योजनांच्या घोषणांमुळे आता जनता समाधानी होत नाही .
- देशात लाखो अडचणी आहेत, पण त्यावर उपाय शोधणारी सव्वाशे कोटी जनता आहे. आज मध्यमवर्गीलाही पासपोर्ट मिळवणं सोप्प झालं आहे, आता अवघ्या आठवडाभरात पासपोर्ट मिळतो, 2015-16 या वर्षात आम्ही पावणे दोन कोटी पासपोर्ट दिले.
- यापूर्वी दिवसाला ७० ते ७५ किमीचे रस्ते बनत होते, आमच्या सरकारच्या कार्यकाळात दिवसाला १०० किमी रस्ते बनवण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत.
- क आणि ड वर्गातील तब्बल ९ हजार सरकारी पदांसाठी मुलाखतीची पद्धत रद्द केली आहे. थेट भरतीमुळे पारदर्शकता आली आहे. 9 हजार पदांसाठी मुलाखत न घेता तरुणांसाठी नोकरीची संधी देण्यात आली.
- ६० वर्षांत केवळ १४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली होती. मात्र आता ६ आठवड्याच ४ कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली. देशातील ७० कोटी नागरिकांना आधारशी जोडले.
- कायद्याचे जंजाळ लोकांसाठी अडचणीचं ठरतं आहे, आम्ही त्यात सुसुत्रीकरण करत आहोत, कायदे कालसुसंगत बनवत आहोत.
- अतिशय कमी वेळात देशातील गावात 2 कोटीहून अधिक शौचालये बनली आहेत.
- देशातील १८ हजार गावांपैकी १० हजार गावात वीज पोहोचल्याचे सांगताना मला आज अतिशय आनंद होत आहे. आम्ही २१ कोटी लोकांना जनधन योजनेशी जोडून असंभव काम संभव करुन दाखवले.
- देशातील १८ हजार गावांपैकी १० हजार गावात वीज पोहोचल्याचे सांगताना मला आज अतिशय आनंद होत आहे. आम्ही २१ कोटी लोकांना जनधन योजनेशी जोडून असंभव काम संभव करुन दाखवले.
- प्रत्येकाने आपल्या घरात एलईडी बल्ब लावून वीजेची बचत करावी तसेच पर्यावरणाचेही रक्षण करावे. ३५० रुपयांचा एलईडी बल्ब ५० रुपयांना विकलाः १३ कोटी बल्बचे वाटप करण्यात आले.
- आधीच्या सरकारच्या काळात महागाईचा दर 10 टक्क्यांवर होता, मात्र आम्ही हा दर 6 टक्क्यांवर जाऊ दिला नाही. - आमच्या सरकारने महागाई नियंत्रित केल्याने गरिबांना दिलासा मिळाला.
- डाळीचे संकट लवकरच दूर करणार, डाळीचं उत्पादन वाढवून दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करणार. शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो मातीतून सोनं उगवेल, जलसिंचन योजनेचा आवाका वाढवणार, शेतक-यांपर्यंत सिंचन योजना लवकर पोहोचवणार.
- जनतेच्या अपेक्षा स्वाभाविक आहेत, मी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- आधीच्या सरकारने आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न केला,पण सरकारपेक्षा भारताची ओळख बनवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
- रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म हा सरकारचा मंत्र आहे.
- आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत,.
- प्रोजेक्ट मॉनिटरिंग ग्रुपच्या साहाय्याने २७० जुन्या प्रोजेक्टवर काम सुरु आहे.
- भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आम्ही आधारला सरकारी योजनाशी जोडलं.
- स्पष्ट धोरण, पारदर्शकतेमुळे आमचं सरकार बेधडक निर्णय घेत आहे.
- आम्ही तोट्यात गेलेल्या बीएसएनएलला नफ्यात आणलं, कोळश्याची समस्या सोडवली, सिंचन योजनेसाठी प्रयत्न सुरु आहेत.
- सुकन्या योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना जोडण्यात आले.
- पोस्ट ऑफिसला पेमेंट बँक बनवण्याचा प्रयत्न,पोस्ट ऑफिसला पुनरुज्जीवित करणार.
- सरकारने सुरु केलेल्या मुद्रा योजनेचा लाभ ३.५० कोटी लोकांहून अधिक लोकांनी घेतला.
- जीएसटीच्या माध्यमातून करप्रणालीत समानता आणण्याचा प्रयत्न. जीएसटीमुळे देशाची आर्थिक शक्ती वाढेल, विधेयक मंजूर करण्यासाठी सर्व पक्षीयांचे आभार.
- जातीपातीमध्ये अडकलेल्या, विभागलेल्या समाजाचे कधीच भले होऊ शकत नाही. दलित, वंचित असो, आदिवासी, साक्षर किंवा निरक्षर, सर्वजण आमचं कुटुंब आहे. सामाजिक न्याय ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे.
- 'विविधतेत एकता' हीच आपल्या देशाची संस्कृती आहे. दहशतवाद वा नक्षलवादसमोर भारत कधीच झुकणार नाही .
आम्ही टाळणं नाही, टक्कर देणं जाणतो, वन रँक वन पेन्शनचं महाकाय आम्ही काम पूर्ण केलं.
- आधीच्या सरकारच्या उणिवा दूर करुन आम्ही पुढे जात आहोत.
- वाट भरकटलेल्या, हातात शस्त्रे घेतलेल्या तरूणांनी आपल्या मायदेशी, आपल्या घरी परत यावं.
- पेशावरच्या शाळेवर हल्ला झाला, शेकडो निरागस मुलांचे प्राण गेले. तेव्हा भारतातील प्रत्येक शाळेत अश्रू तरळले होते, प्रत्येक विद्यार्थी दु:खात होता.
- बलुचिस्तानमधील नागरिक जेव्हा भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानतात, तेव्हा तो सव्वाशे कोटी जनतेचा सन्मान असतो..
- दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांची गय केली जाणार नाही.