लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायाधीश अनुभवी आहेत, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मंगळवारी सांगितले. एका न्यायाधीशांबद्दल तक्रार करणाऱ्या वकिलाला फटकारताना चंद्रचूड यांनी हे उद्गार काढले.
न्या. भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने एका प्रकरणात दिलेला आदेश अॅड. अशोक पांडे यांना पटला नाही. त्यामुळे पांडे चंद्रचूड यांच्या दालनात गेले. वकिली परवाना रद्द करण्याचा इशारा न्यायाधीशांनी दिल्याची तक्रार पांडे यांनी सरन्यायाधीशांकडे केली होती.
'कायद्याच्या मार्गानेच उपाययोजना करा'
• वकील अशोक पांडे यांनी सांगितले की, मी काही जनहित याचिका दाखल करताना मी याचिकाकर्ता म्हणून न्यायालयात हजर राहिलो होतो. त्यावेळी काही कारणांनी मला दंडही ठोठावण्यात आला.• हा दंडाचा आदेश मागे घ्यावा अशी मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली. त्यावर एका न्यायाधीशांनी मला न्यायालयाच्या दालनाबाहेर जायला सांगितले तसेच वकिलीचा परवाना रद्द करण्याचा इशारा दिला.• पांडे यांनी केलेल्या तक्रारीवर सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, तुम्ही तुमच्या प्रश्नावर कायद्यात सांगितले आहे त्याच मागनि उपाययोजना करा.