प्रत्येक गरीबाला कायमस्वरुपी घर देणार; पंतप्रधान मोदींनी राजस्थानात दिला शब्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:30 PM2023-10-02T14:30:59+5:302023-10-02T16:24:53+5:30
गहलोत यांच्या जनहिताची कोणतीही योजना भाजपा रोखणार नाही याची मी खात्री देतो. हा माझा शब्द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसची सत्तेबाहेर पडण्याची उलटी गिनती सुरु झाली असल्याचं विधान नरेंद्र मोदी यांनी केले. याबाबत दिल्लीत बसणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना कधाचित माहिती नसेल, परंतु अशोक गहलोत यांना कल्पना आल्याचा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी केला.
भाजपाचे सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या योजना बंद करु नयेत, अशी विनंती अशोक गहलोत यांनी केली. त्यामुळे गहलोत यांनी आधीच पराभव स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला. तसेच गहलोत यांच्या जनहिताची कोणतीही योजना भाजपा रोखणार नाही याची मी खात्री देतो. हा माझा शब्द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
#WATCH | At Chittorgarh, Rajasthan: Prime Minister Narendra Modi says "...CM Ashok Gehlot is aware that the countdown for Congress's farewell has begun. Gehlot ji himself is confident that he is going and that is why he has already congratulated BJP. He is requesting that after… pic.twitter.com/B1sOJPUHVB
— ANI (@ANI) October 2, 2023
आज मी राजस्थानातील प्रत्येक गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबाला आणखी एक हमी देत आहे की, मोदी प्रत्येक गरीबाला कायमचे घर देणार आहे. आतापर्यंत चार कोटी घरे बांधली गेली आहेत. बाकी राहिलेल्यांवर काम सुरू आहे. तुमचे घरही बांधले जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं. काँग्रेस सरकारला व्होट बँकेची चिंता आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये असे वातावरण निर्माण केले आहे जिथे सर्वसामान्यांना जीवाची चिंता आहे, व्यावसायिकांना व्यवसायाची चिंता आहे, कामगारांना कामाची चिंता आहे. विकासविरोधी वातावरण बदलले पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थान मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे-
भाजपा येईल, गुंडगिरी जाईल
भाजपा येणार, दंगली थांबवणार
भाजपा येईल आणि दगडफेक थांबवेल
भाजपा येईल, बेईमानी थांबेल
भाजपा येणार, महिला सुरक्षा आणणार
भाजपा येणार, रोजगार आणणार
भाजपा येईल, राजस्थान समृद्ध करेल
#WATCH | Rajasthan is saying with great confidence and trust - BJP will come, hooliganism will go, BJP will come and stop the riots, BJP will come and stop stone pelting, BJP will come and stop dishonesty, BJP will come, it will bring women security, BJP will come and bring… pic.twitter.com/4moNI3JTHx
— ANI (@ANI) October 2, 2023