शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

प्रत्येक गरीबाला कायमस्वरुपी घर देणार; पंतप्रधान मोदींनी राजस्थानात दिला शब्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 2:30 PM

गहलोत यांच्या जनहिताची कोणतीही योजना भाजपा रोखणार नाही याची मी खात्री देतो. हा माझा शब्द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसची सत्तेबाहेर पडण्याची उलटी गिनती सुरु झाली असल्याचं विधान नरेंद्र मोदी यांनी केले. याबाबत दिल्लीत बसणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना कधाचित माहिती नसेल, परंतु अशोक गहलोत यांना कल्पना आल्याचा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी केला. 

भाजपाचे सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या योजना बंद करु नयेत, अशी विनंती अशोक गहलोत यांनी केली. त्यामुळे गहलोत यांनी आधीच पराभव स्वीकारला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असा टोलाही नरेंद्र मोदींनी यावेळी लगावला. तसेच गहलोत यांच्या जनहिताची कोणतीही योजना भाजपा रोखणार नाही याची मी खात्री देतो. हा माझा शब्द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

आज मी राजस्थानातील प्रत्येक गरीब, दलित, मागास आणि आदिवासी कुटुंबाला आणखी एक हमी देत ​​आहे की, मोदी प्रत्येक गरीबाला कायमचे घर देणार आहे. आतापर्यंत चार कोटी घरे बांधली गेली आहेत. बाकी राहिलेल्यांवर काम सुरू आहे. तुमचे घरही बांधले जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलं. काँग्रेस सरकारला व्होट बँकेची चिंता आहे. काँग्रेसने राजस्थानमध्ये असे वातावरण निर्माण केले आहे जिथे सर्वसामान्यांना जीवाची चिंता आहे, व्यावसायिकांना व्यवसायाची चिंता आहे, कामगारांना कामाची चिंता आहे. विकासविरोधी वातावरण बदलले पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राजस्थान मोठ्या आत्मविश्वासाने सांगत आहे-

भाजपा येईल, गुंडगिरी जाईलभाजपा येणार, दंगली थांबवणारभाजपा येईल आणि दगडफेक थांबवेलभाजपा येईल, बेईमानी थांबेलभाजपा येणार, महिला सुरक्षा आणणारभाजपा येणार, रोजगार आणणारभाजपा येईल, राजस्थान समृद्ध करेल

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस