ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यास जनता उत्सुक असते. अनेकदा मोदी जनतेला संबोधित करताना देहभानही विसरतात. ब-याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तासांच्या वरही भाषणं करतात. 69च्या प्रजासत्ताक दिनी मोदींनी लाल किल्ल्यावर 86 मिनिटे 10 सेकंद भाषण केलं होतं. भाषण करण्यात त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचाही रेकॉर्ड तोडला आहे.
आता नरेंद्र मोदींच्या भाषणासंदर्भात नवी माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांत प्रत्येक 45 तास 6 मिनिटाला मोदींनी भाषण केलं आहे. भाजपच्या प्रवक्त्या शानया एनसी यांनी ही माहिती टि्वटरवर शेअर केली आहे. मोदींनी पंतप्रधान कार्यकाळातले आतापर्यंत 706 दिवस पूर्ण केले असून, त्यांनी आतापर्यंत 363 वेळा भाषणं केलीत. भारतात त्यांनी 219 वेळा भाषण केलं असून, विदेशात त्यांनी 144 वेळा भाषण केलं आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे एवढं भाषण करणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.