शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सरकारच्या भूमिकेमुळे ईडी, आयकरची अडचण, सुप्रीम कोर्टात २ प्रकरणामध्ये बदललेल्या दृष्टिकोनामुळे सर्वांना आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 8:58 AM

Central Government: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का?

- संजय शर्मानवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांविरोधात ईडी आणि आयकर विभागाच्या कारवाईमुळे आणि विरोधकांच्या टीकेमुळे जनतेच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे का? ही चिंता आता सरकारलाही सतावत आहे काय? गेल्या ४८ तासांत सरकारच्या भूमिकेत झालेल्या बदलामुळे ईडी आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्चर्यचकित झाले.

केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली नसती तर आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला एकापाठोपाठ एक नोटीस पाठवून कारवाई केली नसती. सोमवार हा सर्वोच्च न्यायालयातील संस्मरणीय दिवस असेल. कारण, काँग्रेस पक्षाला पाठवलेल्या ३,५६७ कोटी रुपयांच्या आयकर नोटीसच्या सुनावणीदरम्यान सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, काँग्रेस पक्ष एक राजकीय पक्ष आहे. आयकर नोटीसवरील सुनावणी निवडणुकीनंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात यावी. आयकर विभागही आता कोणतीही कारवाई करणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या या भूमिकेमुळे काँग्रेस पक्षाचे वकील आणि नेते अभिषेक मनू सिंघवी यांना सर्वाधिक आश्चर्य वाटले. सिंघवी तर म्हणाले की, ते नि:शब्द आहेत.

संजय सिंह प्रकरणातही विरोध नाही आपचे खासदार संजय सिंह यांच्या प्रकरणात ईडीने सुप्रीम कोर्टात संजय सिंह यांच्या जामिनाला साधा विरोधही केला नाही. त्यामुळे संजय सिंह यांना सहज जामीन मिळाला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना ईडीला विचारत राहिले की त्यांना संजय सिंह यांना आणखी कोठडीत ठेवायचे आहे का? पण ईडीच्या वकिलांनी एका शब्दानेही आक्षेप घेतला नाही.  

सरकारच्या भूमिकेत बदल?हे सर्व केंद्र सरकारच्या सांगण्यानुसार होत असल्याची चर्चा आहे. कारण सॉलिसिटर जनरल तुषार मेहता किंवा ईडीचे वकील सरकारच्या सूचनेशिवाय एवढा मोठा निर्णय स्वत: घेऊ शकले नसते. सरकारच्या भूमिकेत बदल झाला असेल तर त्याचे परिणाम आणखीही दिसून येऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय