श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकानंतर एक ट्विट करून मेहबुबा मुफ्तींनी भाजपावर टीका केली आहे. जर काश्मीरमध्ये सर्वच परिस्थिती सामान्य आहे, मग मोदी सरकारनं 9 लाख जवान कशासाठी तैनात केले आहेत. पुढे मेहबुबा मुफ्तींनी सांगितलं की, पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळिकीला उत्तर देण्यासाठी जवान तैनात केलेले नाहीत, विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांना रोखण्याचं काम हे जवान करत आहेत.लष्कराची प्राथमिक जबाबदारी ही नियंत्रण रेषेची सुरक्षा करण्याची आहे. आंदोलकांना चिरडण्याचं काम सेनेनं केलेलं नाही. पीडीपी प्रमुखांनाही या दिवसांमध्ये नजरकैद करण्यात आलं आहे. त्यांची मुलगी इल्तिजा ट्विटर अकाऊंटवर सक्रिय आहे. भाजपा मतं मिळवण्यासाठी जवानांचा उपयोग करतंय. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी जवानांचा वार केला जात आहे. सत्ताधाऱ्यांना जवान आणि काश्मिरींची चिंता नाही. त्यांची एकमात्र चिंता निवडणूक जिंकणं ही आहे. तसेच मेहबुबा मुफ्तींनी तीन काश्मिरी नेत्यांना केलेल्या नजरकैदेवरूनही सरकारला धारेवर धरलं आहे.
''काश्मीरमध्ये सगळंच सुरळीत आहे, मग 9 लाख जवान तैनात कशासाठी?''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 5:59 PM