आॅनलाइन लोकमत / नाशिक : शहरात सकाळी साडेसात वाजेपासूनच नागरिकांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले; मात्र अनेक केंद्रांवर मतदान यंत्राने ‘धोका’ दिल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. यामुळे बहुतांश मतदारांनी नाराजी व्यक्त केली.यंदा बहुसदस्सीय प्रभाग पध्दतीने नाशिक महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावरील बुथमध्ये तीन किंवा चार इव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली असून या यंत्रांवरील बटन दाबल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. दरम्यान, काही इव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. काठेगल्ली येथील अटलबिहारी वाजपेयी शाळेमधील एका केंद्रासह जुने नाशिक परिसरातील काही केंद्रांवरही अशाच प्रकारे गोंधळ निर्माण झाला होता.
नाशिकमध्ये इव्हीएम यंत्रात बिघाड; मतदान प्रक्रियेत खोळंबा
By admin | Published: February 21, 2017 9:51 AM