शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

ईव्हीएममध्ये छेडछाड करून निवडणूक जिंकली

By admin | Published: April 06, 2017 4:29 AM

भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला

सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- उत्तरप्रदेशची निवडणूक भाजपने ईव्हीएममध्ये गडबड करून जिंकल्याचा आरोप, राज्यसभेत बसप, सप, काँग्रेससह सर्व विरोधकांनी बुधवारी राज्यसभेत केला. सरकारविरोधी घोषणा देत विरोधक आसनासमोर आल्याने उपसभापतींना कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेसचे दिग्विजयसिंग व प्रमोद तिवारी तसेच सपाचे रामगोपाल यादव व नरेश अग्रवाल यांनी ईव्हीएम मशिनच्या कथित छेडछाडीवर चर्चेसाठी नोटिसा दिल्या होत्या. उपसभापतींनी त्या फेटाळल्या, मात्र सदस्यांना थोडक्यात बोलण्याची अनुमती दिली. ईव्हीएममध्ये कोणताही बदल करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दाद मागावी, असे नमूद करीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे तमाम आरोप फेटाळले.मायावती म्हणाल्या की, सुरुवातीची १00 ते १५0 मते नोंदवल्यानंतर मतदाराने कोणालाही मत दिले तर ते भाजपलाच मिळेल, असे बदल ईव्हीएममध्ये करण्यात आले. हा आरोप ऐकताच सत्ताधारी सदस्य संतापून उठले. यावेळी मायावतींची काही विधाने कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश उपसभापतींनी दिले. संसदीय कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, विरोधकांना पराभव पचवता आलेला नाही. हताशेपोटी ते वाटेल ते आरोप करीत आहेत. याच यंत्रांद्वारे २00४ व २00९ साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या. अलीकडेच बिहार, दिल्ली, पंजाब मणिपूर, गोवा आदी राज्यातही निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी ईव्हीएमच वापरण्यात आली. गुलाम नबी आझाद म्हणाले, निवडणुका पाच राज्यांत झाल्या. मात्र चर्चा उत्तर प्रदेशबाबत होते आहे याचे कारण काय हे समजावून घेतले पाहिजे. तिथे मतांची चोरी अत्यंत सफाईदारपणे करण्यात आली. दिग्विजयसिंग यांनी मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या ईव्हीएम यंत्रांची तपासणी करताना मतदान कोणालाही केले तर भाजपच्या उमेदवारालाच ते मिळेल अशी व्यवस्था केल्याचे आढळून आल्याचा उल्लेख केला. >मतपत्रिकाच हव्यातगुलाम नबी आझाद म्हणाले, वर्षअखेरीला गुजराथ आणि हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक आहे. मध्यप्रदेशात काही पोटनिवडणुका आहेत. ईव्हीएम मशिन्स ऐवजी त्याठिकाणी मतपत्रिकांचा वापर झाला पाहिजे.