शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

'नियम आणि कायदे बदलायला हवेत', EWS आरक्षणाबाबत SCच्या निर्णयावर अमित शहांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 2:45 PM

'मोदी सरकारने बिगर आरक्षित जातींना 10 टक्के आरक्षण लागू केले. या निर्णयाचे समाजातील अनेकांनी स्वागत केले.'

Amit Shah On EWS: गरीब सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण अर्थात EWS आरक्षणाबाबतसर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय दिला. कोर्टाच्या निर्णयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला घटनात्मक मानले आहे. EWS आरक्षण घटनात्मकरित्या लागू करण्यात आले आहे. पण, काळाबरोबर याचे नियम आणि कायदे बदलायला हवेत.

समाजातील लोकांनी या निर्णयाचे स्वागत केलेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, समाजातील लोकांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. काही लोकांनी या निर्णयाला आव्हान दिले. पण, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला याचा मला आनंद आहे. EWS आरक्षण घटनाबाह्य नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. EWS आरक्षण पूर्णपणे घटनात्मक पद्धतीने लागू करण्यात आले.

बिगर आरक्षित जातींना 10 टक्के आरक्षणकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, समाजातील अनेकांना असे वाटायचे की माझ्याकडे कोणतीही व्यवस्था नाही, माझ्याकडे सुविधा नाहीत, मीही आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. अशी भावना समाजातील अनेकांच्या मनात होती. मोदी सरकारने बिगर आरक्षित जातींना 10 टक्के आरक्षण लागू केले. या निर्णयाचे समाजातील अनेकांनी स्वागत केले.

न्यायालयाचा मोठा निर्णयआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देणाऱ्या 103व्या घटनादुरुस्तीच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी शिक्कामोर्तब केले. EWS आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करणाऱ्या खंडपीठातील पाच पैकी तीन न्यायाधीशांनी EWS आरक्षण कायम ठेवले. CJI यूयू लळीत यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. सरन्यायाधीश यूयू ललित यांच्याशिवाय न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांचा समावेश होता.

टॅग्स :Amit Shahअमित शाहreservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय