शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

"भाजपाचे तीन मुख्यमंत्री असे आहेत जे कदाचित मोदी-शाह यांचा झेंडा स्वीकारणार नाहीत?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 5:47 PM

EX IAS Surya Pratap Singh taunt on Modi government and BJP : भाजपावर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत भाष्य केलं आहे.

नवी दिल्ली - सेवानिवृत्त आयएएस अधिकारी सूर्य प्रतापसिंह (Surya Pratap Singh) हे सोशल मीडियावर आपल्या विधानांसाठी खूपच लोकप्रिय आहेत. त्यांनी आता थेट भाजपा आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपावर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याबाबत भाष्य केलं आहे. "आता उत्तर प्रदेशमध्ये 'खेला होबे' नक्की" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच "वरवर दिसणाऱ्या शांततेदरम्यान येणारे काही आवाज हे नक्कीच काहीतरी संकेत देत आहेत" असं देखील म्हटलं आहे. सूर्य प्रतापसिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

सूर्यप्रताप सिंह यांनी "भाजपाचे तीन मुख्यमंत्री असे आहेत जे कदाचित मोदी-शाह यांचा झेंडा स्वीकारणार नाहीत? टोकाच्या या लढाईत ही सर्वशक्तिमान जोडीची ताकद कमी होते आहे का? वरवर दिसणाऱ्या शांततेदरम्यान येणारे काही आवाज हे नक्कीच काहीतरी संकेत देत आहेत. आता काहीही झालं तरी, आता उत्तर प्रदेशातही खेला होबे नक्की" असं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसचे आमदार मुकेश शर्मा यांनी देखील भाजपावर निशाणा साधला आहे. "भाजपाचा खेळ अयशस्वी ठरला आहे. मुख्यमंत्री बदलणं हा प्रयोग नसून अपयश लपवण्याचा खेळ आहे" असं म्हटलं आहे. याच दरम्यान, सूर्यप्रताप सिंह यांची पोस्ट पाहून अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

"मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला"

काँग्रेसने (Congress) ट्विटरवर #CM_नहीं_PM_बदलो ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकार आणि भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे. "मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, CM नाही तर PM बदला" असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसने याबाबत काही ट्विट्स केली आहेत. "भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही" असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. "श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र" असल्याचं देखील अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.

"मोदी सरकार अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?"

देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावरून देखील काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. "आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार?" असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलं आहे. याआधी देखील काँग्रेसने विविध मुद्द्यांवरून मोदींवर निशाणा साधला आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाPoliticsराजकारणIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश