नवी दिल्ली - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना गुरुवारी एम्समधून छुट्टी मिळाली. गेल्या 19 एप्रिलला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. 88 वर्षीय मनमोहन सिंग यांनी कोरोना व्हायरस लशीचे दोन्हीही डोस घेतले आहेत.
मनमोहन सिंग हे दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. तसेच ते ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञही आहेत. ते रिझर्व बँकेचे गव्हर्नरही होती.
पंतप्रधान मोदींना लिहिले होते पत्र -कोरोनाची लागण होण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक पत्रही लिहिले होते. या पत्रामधून त्यांनी नरेंद्र मोदींना देशातील कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सल्ला दिला होता. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. कारण कोरोनाविरोधातील लढाईत ही बाब महत्त्वपूर्ण आहे. तसेच, आतापर्यंत किती लोकांचे लसीकरण झाले आहे, याकडे लक्ष न देता एकूण लोकसंख्येपैकी कीती लोकांचे लसीकरण झाले आहे. यावर लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे सिंग म्हटले होते. मनमोहन सिंग यांनी लिहिलेले हे पत्र पी. चिदंबरम यांनी शेअर केले होते.
सीडब्ल्यूसीच्या बैठकीतील चर्चेदरम्यान मिळालेले सल्ले या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवण्यात आले होते. पंतप्रधानांना लिलिहेल्या पत्रात डॉ. मनमोहन सिंग यांनी 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही लसीकरणामध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती.CoronaVirus: कोरोनावर बड्या-बड्या देशांना जमला नाही, असा करिश्मा छोट्याशा भूटाननं करून दाखवला; बघा, कसा?
वेगवेगळ्या लसींबाबत सरकारचे काय आदेश आहेत. तसेच पुढच्या सहा महिन्यांमध्ये कोरोना लसीचा साठा मिळण्याबाबत काय परिस्थिती आहे, हे सरकारने सांगितले पाहिजे. तसेच विविध राज्यांना त्यांना अपेक्षित असलेला लशींचा साठा कसा मिळेल, हे केंद्र सरकारने पाहिले पाहिजे. तसेच राज्यांना फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणी परिभाषित करण्याची सूट दिली गेली पाहिजे, असा सल्लाही सिंग यांनी या पत्रातून पंतप्रधान मोदींना दिला होता.
भारत सरकारने लसनिर्मात्यांना काही अधिकच्या सवलती द्यायला हव्यात. इस्रायलप्रमाणे अनिवार्य लायसन्सिंगची व्यवस्था लागू करायला हवी. ज्या लशींना युरोपियन मेडिकल एजन्सीने किंवा यूएसएफडीएने मान्यता दिली आहे, अशा लसींची आयात करून त्या उपयोगात आणायला हव्यात. असेही सिंग यांनी त्यांच्या पत्रात म्हटले होते.CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878 रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.