कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारनं लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. परंतु अनेक ठिकाणी लसींची कमतरता असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी करोनाच्या लसीकरणावर (Covid Vaccination) वेगावर चिंता व्यक्त केली आहे. तसंच त्यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi Government) निशाणा साधला आहे. आम्हाला लस हवी आहे, अश्रू नकोत, असंही ते म्हणाले आहेत. “केंद्र सरकारनं २१ जानेवारी २०२१ रोजी दावा केला होता की जुलै अखेरपर्यंत ३० कोटी भारतीयाचं पूर्ण लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २२ मे २०२१ पर्यंत केवळ ४.१ कोटी भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत,” असं जयराम रमेश म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला. “केंद्र सरकारनं २१ मे रोजी दावा केला होता की २०२१ च्या अखेरपर्यंत भारतात सर्व ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण केलं जाईल. परंतु सत्य हे आहे की २१ मे रोजी एका दिवसात केवळ १४५ लाख लोकांचं लसीकरण करण्यात आलं. आम्हाला लस हवी आहे मगरीचे अश्रू नकोत,” असंही ते म्हणाले.
“दावा ३० कोटींचा, पण खरं लसीकरण ४ कोटीच”; माजी केंद्रीय मंत्र्याचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 2:59 PM
माजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य.
ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्र्यानं लसीकरणाच्या वेगावर व्यक्त केली चिंता. आम्हाला लस हवी आहे, मगरीचे अश्रू नकोत, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचं वक्तव्य