नवी दिल्ली :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सभागृहात गदारोळ सुरू असतानाच विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव टाकला होता, असा दावा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. हमीद अन्सारी यांनी आपल्या 'बाय मेनी अ हॅप्पी अॅक्सीडेंट' या पुस्तकात यासंदर्भातील दावा केला आहे.
हमीद अन्सारी यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, एक दिवस अचानक पंतप्रधाननरेंद्र मोदी दालनात आले आणि सभागृहात गदारोळ सुरू असताना विधेयक मंजूर न करणे ही त्यांची भूमिका अडचणीची ठरत आहे, असे सांगत आपणाकडून मोठी जबाबदारी पार पाडण्याची अपेक्षा आहे. मात्र, आपण माझी मदत करत नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
सभागृहाच्या आत आणि बाहेर माझे काम सार्वजनिक असल्याचे अन्सारी यांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले होते. यावर सभागृहात गदारोळ सुरू असताना विधेयक मंजूर का केले जात नाही, असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला होता, असेही अन्सारी यांच्या पुस्तकात म्हटले आहे.
हमीद अन्सारी यांच्या हा दावा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोडून काढला आहे. हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती असताना काँग्रेसच्या कार्यकाळात अनेकदा गदारोळ सुरू असताना विधेयके मंजूर केली होती, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. काँग्रेस कार्यकाळात २००७ ते २०१४ या कालावधीत हमीद अन्सारी यांनी १३ विधेयके गदारोळातच मंजूर केली होती, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
हमीद अन्सारी यांनी मंजूर केलेल्या विधेयकांमध्ये मर्चंट शिपिंग, कॅरिज बाय रोज, स्पर्धा दुरुस्ती, सिगारेट आणि टोबॅको प्रोडक्ट्स, एससी-एसटींना पदांमध्ये आरक्षण, आयटी दुरुस्ती, एम्स दुरुस्ती, रेल्वे एप्रोप्रिएशन आणि आंध्र प्रदेश पुनर्गठन यांसारख्या विधेयकांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.