शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

एक्सलंट परफॉर्मन्स... टीम इंडियाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 8:07 AM

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खेळीची विश्वविक्रमी नोंद झाली.

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : यंदा भारतात होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेकडे जगाचे लक्ष लागले असून भारतीयांनाही मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे, भारतीय संघाच्या कार्यशैलीवर देशवासीयांच्या नजरा खिळल्या आहेत. भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानलाही मात दिलीय. त्यामुळे, भारतीय आनंदीत आहेत. टीम इंडियाच्या खेळीमुळे यंदाचा वर्ल्डकप आपणच जिंकू असा विश्वास भारतीयांना आहे. त्यामुळे, संघाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टीम इंडियाचे कौतुक केलं आहे. 

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) खेळीची विश्वविक्रमी नोंद झाली. त्याने ८४ चेंडूंत १६ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या आतषबाजीसह १३१ धावा कुटल्या आणि त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. रोहित व इशान किशन यांनी १५६ धावांची सलामी देताना भारताच्या पाया मजबूत केला आणि त्यानंतर विराट कोहलीने घरच्या मैदानावर विजयी कळस चढवला. भारताने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्ताचा पराभव करून सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन टीम इंडियाचं कौतुक केलंय. 

भारताने वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर आता अफगाणिस्तानवरही मोठा विजय मिळवला. भारतीय संघाचा हा दोन्ही सामन्यातील खेळ अतिशय उत्तम आणि आत्मविश्वासपूर्ण असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तसेच, भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या आहेत. 

विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य

अफगाणिस्तानने ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला होता. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ओमारझाई ( ६२) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. मोहम्मद सिराज हा आजच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले. अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. २०१९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लीड्स येथे २८८ धावा केल्या होत्या.   

रोहित शर्माचा अफलातून फॉर्म

फलंदाजीला मैदानावर उतरलेला रोहित शर्मा आज वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने जबरदस्त फटकेबाजी करून स्टेडियम दणाणून सोडले. वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान १००० धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं, असे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडताना त्याने गोलंदाजांची अवस्था दयनीय केली. त्याने ६३ चेंडूंत शतक झळकावले आणइ वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील भारताकडून सर्वात वेगवान शतक ठरले. कपिल देव यांनी १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ७२ चेंडूंत शतक झळकावले होते. राशीद खानने इशानला ४७ धावांवर झेलबाद केले. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताकडून झालेली ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघRohit Sharmaरोहित शर्माNarendra Modiनरेंद्र मोदी