शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

केरळमध्ये कोरोनाचा JN.1 सबव्हेरिएंट सापडल्याने खळबळ, केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:06 PM

Corona Virus: केरळमध्ये कोविड-१९चा सब-व्हेरिएंट जेएन.१चा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

केरळमध्ये कोविड-१९चा सब-व्हेरिएंट जेएन.१चा एक रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. परिस्थितीवर पूर्ण लक्ष असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने सांगितले की, भारतीय सार्स कोव्ह-२ जिनोमिकी संस्थेने नियमित तपासणीदरम्यान, केरळमध्ये कोरोना विषाणूचा एक सबव्हेरिएंट असलेल्या जेएन.१ चा एक रुग्ण शोधला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीच्या उपायांचं आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित अभ्यासादरम्यान राज्यामध्ये सर्व सर्व सुविधांची मॉकड्रील आयोजित करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

केरळमध्ये आठ डिसेंबर रोजी कोविड-१९ चा सबव्हेरिएंट असलेल्या जेएन.१ चा एक रुग्ण सापडल्याची अधिकृत सूत्रांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ७९ महिलेच्या नमुन्याची १८ डिसेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यात तिला संसर्ग झाल्याचे दिसून आले. या महिलेमध्ये इन्फ्लूएंझासारख्या आजारांची सौम्य लक्षणे होती, तसेच ती कोविड-१९ च्या संसर्गामधून बरी झाली आहे.  

सूत्रांनी सांगितले की, देशामध्ये कोविड-१९ चे सध्या सापडलेले ९० टक्के गंभीर नाही आहेत. तसेच संसर्ग झालेले लोक त्यांच्या घरांमध्येच विलगीकरणामध्ये राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशामध्ये  जेएन.१ चा संसर्ग सापडला होता. ही व्यक्ती मुळची तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. तसेच त्याने २५ ऑक्टोबर रोजी सिंगापूरचा दौरा केला होता.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ