शीलेश शर्मा, नवी दिल्लीजपानमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी होणारे अनावरण टाळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चीन भेटीवर जाण्याला प्राधान्य दिले आहे. परिणामी त्यांचा जपानदौरा रद्द झाला आहे.महाराष्ट्र सरकारमधील तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी हा पुतळा प्रत्यक्षात आणण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. जपानच्या कोयासान या पवित्र बुद्ध संस्थेच्या १२००व्या वर्धापनदिनी हा पुतळा उभारला जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून भारतातून बौद्ध धर्माचा जपानमध्ये प्रसार १२०० वर्षापूर्वी झाल्याचा योगायोगही त्यामागे आहे. कोयासानच्या नेतृत्वाने या पुतळ्याला अतिशय महत्त्व दिले असून, महाराष्ट्रातील तत्कालीन आघाडी सरकार आणि वाकायामा राज्यादरम्यान झालेल्या सामंजस्य करारातून तो प्रत्यक्षात येत आहे.
अनावरण सोडून मुख्यमंत्री चीनकडे
By admin | Published: May 14, 2015 2:10 AM