नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान आज आटोपले. त्यानंतर विविध वाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. दरम्यान, अचूक आणि धक्कादायक अंदाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेश आणि पंजाबसाठी धक्कादायक निकालांचे भाकित एक्झिट पोलने केले आहे.
न्यूज २४-टुडेज चाणक्यने उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ११७ पैकी १०० हून अधिक जागा मिळतील, असे भाकित केले आहे. तर या सर्व्हेने उत्तराखंडमध्ये भाजपाला ४३ जागांसह बहुमत मिळतील असा दावा केला आहे.
न्यूज २४-टुडेज चाणक्यने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाच्या बंपर विजयाचा दावा करण्यात आला आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ४०३ पैकी २९४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समाजवादी पक्षाला १०५ जागाला मिळण्याची शक्यता आहे. तर बसपाला २, काँग्रेसला १ आणि इतरांना १ जागा मिळण्याची शक्यता आहे.
न्यूज २४-टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आप शतक फटकावण्याची शक्यता आहे. त्यानुसार पंजाबमध्ये ११७ पैकी १०० जागा आम आदमी पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. तर सध्याच्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ १० आणि अकाली दलाला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यात केवळ एक जागा जाऊ शकते.
न्यूज २४-टुडेज चाणक्य एक्झिट पोल उत्तर प्रदेश भाजपा २९४सपा -१०५बसपा २काँग्रेस १इतर १
पंजाब आप - १००काँग्रेस - १० अकाली दल - ६ इतर -१
उत्तराखंड भाजपा -४३काँग्रेस -२४इतर -३