हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 06:06 AM2024-10-06T06:06:36+5:302024-10-06T06:08:41+5:30
एक्झिट पोलचे निष्कर्ष; जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ आघाडी बहुमताच्या जवळ, पीडीपी व अपक्ष किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकांसंदर्भात ८ व जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांबाबत ५ एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाले. हरयाणात भाजपचा पराभव करून काँग्रेस सत्तेवर येणार असल्याचा निष्कर्ष या विधानसभा निवडणुकांतील आठही एग्झिट पोलमध्ये काढण्यात आला, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार येणार असल्याचे भाकित यासंदर्भातील ५ पैकी ३ एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आले आहे.
८ ऑक्टोबरला मतमोजणी
यंदा जम्मू-काश्मीरची निवडणूक तीन टप्प्यांत, हरयाणाची एकाच टप्प्यात पार पडली. दोन्ही निवडणुकांची ८ ऑक्टोबरला मतमोजणी, तसेच निकाल जाहीर होईल. जम्मू-काश्मीर व हरयाणाची निवडणूक प्रक्रिया अनुक्रमे १ ऑक्टोबर व ५ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली. हरयाणा व जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी ९० जागा आहेत. बहुमतासाठी किमान ४६ जागांवर विजय आवश्यक आहे.
..तर छोटे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतील
हरयाणात भाजप व काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. जर कोणालाही बहुमत मिळाले नाही, तर छोटे पक्ष, अपक्ष हे सरकार बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. ओमप्रकाश चौताला यांच्या इंडियन नॅशनल लोकदल पक्षाने बहुजन समाज पक्षाशी आघाडी केली. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाशी आघाडी केली आहे. आपने सर्व ९० जागा लढविल्या.
हरयाणा विधानसभा एकूण जागा - ९० बहुमत - ४६
सर्व्हे करणारी संस्था भाजपसहित काँग्रेससहित अन्य
एनडीए इंडिया आघाडी
ध्रुव रिसर्च २७ ५७ ०-६
सीएनएन२४ २१ ५९ १०
रिपब्लिक मॅट्रिज १८-२४ ५५-६२ २-५
पीपल्स-पल्स २०-३२ ४९-६१ ०-५
दैनिक भास्कर २९-२३ ४४-५४ १-९
इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया २१ ५९ २-६
डेटाअंश-रेड माईक २०-२५ ५०-५५ ०-४
मनी कंट्रोल २४ ५८ ६
जम्मू-काश्मीर विधानसभा एकूण जागा - ९० बहुमत - ४६
सर्व्हे करणारी भाजप काँग्रेस, नॅशनल पीडीपी अन्य
संस्था कॉन्फरन्स आघाडी
एबीपी-सी व्होटर्स २७-३२ ४०-४८ ६-१२ ६-११
रिपब्लिक मॅट्रिज २५ २७ २८ ७
पीपल्स-पल्स २३-२७ ४६-५० ७-११ ४-६
दैनिक भास्कर २०-२५ ३५-४० ४-७ ९-१२
मनी कंट्रोल २६ ४० ७ १७
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकांत जर त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली, तर पीडीपी व अपक्ष उमेदवार किंगमेकरची भूमिका बजावू शकतात.