एबीपी न्यूज-सीएसडीएस exit poll : गुजरातमध्ये मोदींचाच करिश्मा, भाजपा सत्ता राखण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 06:15 PM2017-12-14T18:15:05+5:302017-12-14T20:43:50+5:30
गुजरातमध्ये 22 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधातील अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक कमालीची चुरशीची झाली.
नवी दिल्ली - गुजरातमध्ये 22 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधातील अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक कमालीची चुरशीची झाली. मात्र आज जाहीर झालेल्या एबीपी न्यूज-सीएसडीएसच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच सत्तेत पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 49 टक्के मतांसह 117 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, काँग्रेसला केवळ 64 जागांवर समाधान मानावे लागणार आहे, असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये केवळ एक जागा जाण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी एबीपी न्यूज आणि सीएसडीएसने जाहीर केलेल्या ओपिनियन पोलमध्ये गुजरातमध्ये अटीतटीची लढच होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. राज्यात 22 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेस आणि भाजपात अटीतटीची लढत होण्यार असून, दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखेल असा दावा करण्यात आला होता. भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला होता.
- गुजरातमध्ये भाजपाला 49 टक्के मते मिळण्याची शक्यता
- काँग्रेसला 41 टक्के मिळण्याची शक्यता
इतरांना मिळणार 10 टक्के मते
- भाजपाला 112 ते 122 जागा
- काँग्रेसाला 60 ते 68 जागा
- इतरांना -1 जागा
या एक्झिट पोलमध्ये गुजरातच्या मतदारांचा विभागवार दिसून आलेला कल पुढीलप्रमाणे
- सौराष्ट्र-कच्छ (एकूण जागा 54)
- सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपाला आघाडी
- भाजपाला 49 टक्के तर काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांना 10 टक्के मते मिळणाची शक्यता
- भाजपाला 34 तर काँग्रेसला 19 आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता
दक्षिण गुजरात (एकूण जागा 35)
- दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळण्याची शक्यता
दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला 52 टक्के, काँग्रेसला 40 जागा
- दक्षिण गुजरातमध्ये भाजपाला 24 तर काँग्रेस 11 जाहा मिळण्याची शक्यता
उत्तर गुजरात ( एकूण जागा 53)
- उत्तर गुजरातमध्येही भाजपा आघाडीवर
- उत्तर गुजरातमध्ये भाजापाला 49 टक्के तर काँग्रेसला
- उत्तर गुजरातमध्ये भाजपाला 35 तर काँग्रेसला 18 जागा मिळण्याची शक्यता
मध्य गुजरात ( एकूण जागा 40)
- मध्य गुजरातमध्येही भाजपाला आघाडी
- मध्य गुजरातमध्ये भाजपाला 47 टक्के तर काँग्रेसला 42 टक्के जागा मिळण्याची शक्यता
- मध्य गुजरातमध्ये भाजपाला 24 जागा तर काँग्रेसला 16 जागा मिळण्याची शक्यता
सर्व वाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलची आकडेवारी