शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

वाढवण बंदरामुळे आता जेएनपीटीची क्षमता वाढेल - जहाज बांधणी राज्यमंत्री मनसुख मांडविया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:27 AM

कोरोनात मजुरांना आपापल्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अशीच स्थिती मालवाहू जहाजांवरही होती, असे नमूद करून मांडविया म्हणाले

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : वाढवण बंदरामुळे जेएनपीटीवरील भार कमी होईल. त्याचा आर्थिक लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेएनपीटीची वाहतूक क्षमता १० मिलिअन टीईयूने वाढेल, असा विश्वास केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी देशातील जहाजबांधणी उद्योगाचा आढावा घेतला. कोरोनामुळे जहाजांवर अडकून पडलेल्या क्रू मेंबर्सना परत आणण्यासाठी राबवलेल्या सर्वात मोठ्या अभियानाची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र जहाजबांधणी मंत्रालयासाठी महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे वाढवण पोर्ट आमच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे नमूद करून ते म्हणाले, तब्बल ९ लाख अमेरिकन डॉलर्स खर्चून उभे राहणाऱ्या या बंदरामुळे डहाणू-पालघरसारख्या भागाचाही विकास होईल.६५ हजार ५४५ कोटीवाढवण पोर्टच्या उभारणीसाठी सुमारे ६५ हजार ५४५ कोटी रुपये खर्च होतील. त्यातील १४ हजार ५०० रुपये जीएसटी असेल. देशात सध्या जेएनपीटी, मडगाव, न्यू मंगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता हे प्रमुख पोर्ट (बंदरे) आहेत.जहाज वाहतुकीस चालना मिळेल. जेएनपीटी बंदरावर मोठ्या प्रमाणावर मालवाहू जहाजे येतात. वाढवण पोर्ट उभे राहिल्यास हा भार कमी होईल. आमच्या अंदाजाप्रमाणे वाढवण पोर्टमुळे जेएनपीटी क्लस्टरची क्षमता जगात वाढेल. जगातील सर्वाधिक कंटेनर वाहतूक होणाºया पहिल्या दहा पोर्टच्या यादीत जेएनपीटीचा समावेश होईल.

कोरोनात मजुरांना आपापल्या स्थानी नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अशीच स्थिती मालवाहू जहाजांवरही होती, असे नमूद करून मांडविया म्हणाले, आतापर्यंत १ लाख कर्मचाऱ्यांना (क्रू मेंबर्स) चार्टर्ड विमाने, जहाजांवरून नेण्याची जहाजबांधणी मंत्रालयाने केली.