उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि एस आर कोहली यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्याच आल्याची घोषणा पीसी चाको यांनी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक झाली यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
शरद पवार यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारीणीने विश्वास दर्शविला आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीने आज 8 ठराव पारित केले. समितीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आणि एनडीएशी हातमिळवणी केलेल्या ९ आमदारांची हकालपट्टी करण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली.
पक्षाच्या 27 राज्य समित्यांपैकी एकाही समितीने आपण शरद पवार यांच्यासोबत नसल्याचे सांगितले नाही. संघटना अबाधित आहे, असे चाको म्हणाले. यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. कुणी काही नियुक्त्या केल्या त्याला अर्थ नाही. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास, पुढील कायदेशीर संस्थांकडे जाण्याची गरज लागणार नाही असे आम्हाला अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.