शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
2
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
3
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
4
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
5
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
6
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
7
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
8
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
9
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
10
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
11
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
12
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
13
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
14
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
16
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
17
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
18
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
19
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
20
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 

एटीएमच्या बदलांना दीड हजार कोटींचा खर्च

By admin | Published: November 17, 2016 2:28 AM

एटीएम यंत्रातून नोटा मिळवण्याची सवय लागलेल्या नागरिकांना बँकेत जाऊन विड्रॉ स्लिपने पैसे काढणे अवघड जात आहे. मात्र हा

राजू इनामदार / पुणेएटीएम यंत्रातून नोटा मिळवण्याची सवय लागलेल्या नागरिकांना बँकेत जाऊन विड्रॉ स्लिपने पैसे काढणे अवघड जात आहे. मात्र हा त्रास त्यांना अजून काही महिने तरी सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत. २ हजार रूपयांची चलनात आलेली नवी नोट तसेच भविष्यात येणारी ५०० रूपयांची नोट लांबी व रुंदीलाही आकारात वेगळी असल्याने देशभरातील अडीच लाखपेक्षा जास्त एटीएम यंत्रांचे सेटिंग बदलावे लागणार आहे.कॉन्फिग्रेशन करावे लागेल- क्षेत्रातील काही तज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतची तांत्रिक माहिती दिली. एटीएम यंत्रात फिक्स डायमेन्शन व डायनॅमिक डायमेन्शन अशा दोन पैकी एक कॅसेट असते. यातील कोणत्याही कॅसेटमध्ये नव्या २00 रूपयांच्या नोटेचे कॉन्फ्रिेगेशन करायचे असेल तर हार्डवेअर व सॉफ्टवेअर असा दोन्हींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. तसे केले नाही तर फक्त १०० रूपयांच्या नोटा मिळण्यासाठीच हे यंत्र उपयुक्त ठरेल. सॉफ्टवेअरमध्ये करावा लागेल बदल तांत्रिक बदल केल्यानंतरही एटीएम लगेचच नव्या नोटा देण्यासाठी सज्ज असेल असे नाही. त्यासाठी बँकेला एटीएम यंत्राच्या अ‍ॅप्लिकेशन सर्व्हिस प्रोव्हाईडरला याबाबत माहिती देणे गरजेचे असते. कॅसेट १ ते ४ अशी प्रत्येक कॅसेटची स्वतंत्र माहिती पुरवावी लागेल. ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यास असलेले सॉफ्टवेअर बदलावे लागेल.एटीएममध्ये कॅसेट टाकाव्या लागतील...ज्या एटीएम यंत्रांमध्ये दोनच कॅसेट वापरल्या जात आहेत, (फक्त ५०० व १०० च्या नोटा किंवा १ हजार व ५०० च्या नोटा) त्यांना आणखी दोन कॅसेटचा संच यंत्राला बसवावा लागणार आहे. यासाठीचा अंदाजे खर्च ७० ते ८० हजार इतका आहे. अशी किमान लाखभर यंत्रे असावीत असा अंदाज आहे. पूर्वीपेक्षा अधिक मूल्याच्या नोटा-डायनॅमिक डायमेन्शनच्या कॅसेटमध्ये दोन फ्यूज असतात. त्या फ्यूजवरून कॅसेटचे डायमेन्शन नव्या नोटेच्या आकाराप्रमाणे बदलून घ्यावे लागणार आहे. फिक्स डायमेन्शच्या कॅसेटमध्ये नव्या नोटेच्या आकाराची वेगळी कॅसेटच बसवावी लागेल. २ हजारांची नोट आकारात जास्त असली तरी जाडीमध्ये अगदीच कमी असल्याने पुर्वीपेक्षा जास्त नोटा यंत्रात बसतील. त्यांचे मुल्यही २ हजार म्हणजे पुर्वीपेक्षा दुप्पट असल्याने जास्त पैसे मिळतील.