चंदीगड : हरयाणामध्ये गेल्या वर्षी झालेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. राज्यात २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात झालेल्या या महोत्सवात प्रमुख पाहुण्यांना गीता भेट देण्यात आली, त्यासाठी सरकारने तब्बल ३ लाख ८0 हजार रुपये खर्च केले आहेत. गीतेच्या एका प्रतीची किंमत ३८ हजार रुपये दाखवण्यात आल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.श्रीमद् भागवद् गीतेची प्रत आॅनलाइन वा गीता प्रेसमधून विकत घ्यायला काय हरकत होती. तिथे ती खूप स्वस्त आहे, मग त्यासाठी जादा रक्कम मोजण्याचे कारण काय, याचे उत्तर मुख्यमंत्री खट्टर यांनी द्यावे, अशी मागणी लोकदलाचे नेते आयएनएलडीचे नेते व खासदार दुष्यंत चौटाला यांनी केली आहे.आपण भ्रष्टाचार सहन करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. पण धार्मिक कार्यक्रमात गीतेच्या प्रतींवर इतकी प्रचंड रक्कम खर्च करण्यात निश्चितच गैरव्यवहार झाला आहे, असे चौटाला म्हणाले. स्वपक्षाच्या खासदारांना धार्मिक कार्यक्रमासाठी इतकी रक्कम देण्याचे कारण काय, असा सवालही त्यांनी केला.भूपेंद्रसिंह हुड्डा सरकारने जो कार्यक्रमात काही लाखांत केला, त्यावर खट्टर सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याबद्दल काँग्रेसनेही भाजपाला धारेवर धरले आहे. या प्रकरणाची चौकशी न केल्यास आपण कॅगकडे या प्रकरणाची तक्रार करू, असे खा. चौटाला म्हणाले. (वृत्तसंस्था)...तर साडेचार हजारचआला असता खर्चगोरखपूरच्या गीता प्रेसने प्रसिद्ध केलेल्या गीतेच्या प्रतीची किंमत १५० ते ४५० रुपये आहे. असे असताना गीतेच्या १0 प्रती विकत घेण्यासाठी ३ लाख ८0 हजार रुपये खर्च करण्यात आले. म्हणजे दहा प्रतींसाठी सरकारला जास्तीत जास्त ४.५ हजार खर्च आला असता. त्याऐवजी जवळपास चार लाख खर्च केले. असे करण्याचे कारण काय, असा प्रश्न विरोधी पक्षांनी केला आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय लोकदलाने मनोहरलाल खट्टर सरकारवर टीकेची झोडच उठवली आहे.काळेबेरे आढळल्यास चौकशी करूआरोग्यमंत्री अनिल विज यांनी हे आरोप फेटाळताना, गीता महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम होता, त्यामुळे तो त्या पद्धतीने साजरा कणºयात आला, असे सांगितले. तसेच या प्रकरणात काही काळेबेरे आढळून आल्यास त्याची चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू, असेही ते म्हणाले.भाजपाच्या कार्यक्रमात भाजपा नेत्यांना ३० लाखांचे मानधनया कार्यक्रमासाठी भाजपच्या दोन खासदारांनाही मानधन देण्यात आल्याचेही माहिती अधिकारात उघड झाले आहे.भाजपाच्या खासदार हेमामालिनी २० लाख तर दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना १० लाख रुपये मानधन दिल्याबद्दलही सरकारवर टीका होत आहे.
भगवद्गीतेच्या १0 प्रतींसाठी तब्बल पावणेचार लाख रुपये खर्च; भ्रष्टाचाराविरोधात रान उठवणा-या भाजपाच्या राज्यातच गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 6:09 AM