ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 21 - 1996 ते 2017 दरम्यान असणा-या सर्व रेल्वेमंत्री आणि खासकरुन कर्नाटक सरकारने श्रवणबेलगोलापासून ते हसन - बंगळुरु ब्रॉडगेज लाईनचं काम पुर्ण केल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की या प्रोजक्टवर जितका खर्च झाला आहे, त्यापेक्षाही मंगळावर जाणं स्वस्त आहे.
हा प्रोजेक्ट पुर्ण होण्यासाठी तब्बल 21 वर्ष लागली. नुकतंच या प्रोजेक्टची सुरक्षा तपासणी करण्यात आली असून लवकरच सेवा सुरु केली जाणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेवसाईटमध्ये या 167 किमी लांब रेल्वे लाईनची किंमत 1289.92 कोटी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तुम्हाला ऐकून आनंद होईल की यापेक्षाही कमी खर्चात मंगळावर जाणं शक्य आहे. भारताच्या मंगळ मोहिमेचा खर्च 450 कोटी आहे.
ही रेल्वे लाईन माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. 1996-97 मध्ये आपल्या कार्यकाळात त्यांनी या प्रोजेक्टचा खर्च 295 कोटी सांगितला होता. मात्र याचा खर्च त्याच्या चारपट झाला आहे.