शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

धक्कादायक! शिटी खराब झाल्याने प्रेशर कुकरचा मोठा स्फोट; स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 11:42 AM

महिला घरात अन्न शिजवत असताना प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राजस्थानमधील जयपूरच्या झोटवाडा पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. महिला घरात अन्न शिजवत असताना प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रेशर कुकरचा स्फोट इतका जोरदार होता की कुकरचे तुकडे झाले. ते तुकडे महिलेच्या डोक्यात घुसले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची  माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झोटवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलवड रोडवर असलेल्या भोमिया नगरमध्ये सोमवारी सकाळी ही घटना घडली. भोमिया नगर रहिवासी राजकुमार सिंह यांची 40 वर्षीय पत्नी किरण कंवर स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. त्याचवेळी गॅसवर असलेल्या प्रेशर कुकरमध्ये अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे कुकरचे तुकडे झाले. प्रेशर कुकरचा स्फोट झाल्याने स्वयंपाकघरातील सर्व वस्तू खराब झाल्या. 

प्रेशर कुकरमधील या स्फोटाचा आवाज आजूबाजूच्या घरांपर्यंत ऐकू आला. ते ऐकून लोक घराबाहेर पडले. या घटनेत किरण कंवर यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच झोटवाडा पोलीस ठाणे आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले. एफएसएल पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेशर कुकरची शिट्टी खराब झाल्यामुळे कुकरमधून वाफ बाहेर येत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे कुकरच्या आत प्रचंड दाब निर्माण होऊन मोठा आवाज होऊन त्याचा स्फोट झाला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. किरण कंवर यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान