दिल्लीतील असलेल्या इस्रायलच्या दुतावासाहेर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळापूर्वीच त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. बॉम्ब स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे. सध्या अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे. इस्रायलच्या दुतावासापासून १५० मीटर अंतरावर काही गाड्या उभ्या होत्या. याच ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. "या स्फोटात कोणीही जखमी अथवा कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या ठिकाणी उभ्या असेलेल्या काही गाड्यांचं नुकसान झालं आहे. या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुरूवातीच्या तपासात काही समजाकंटकांचा हात असल्याचं दिसून येत आहे," अशी माहिती दिल्लीपोलिसांकडून देण्यात आली.
दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी
By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 6:20 PM
अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल
ठळक मुद्दे अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखलपोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी