शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

उत्तर प्रदेश विधानसभेत सापडली स्फोटक पावडर

By admin | Published: July 15, 2017 12:17 AM

उत्तरप्रदेश विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार राम गोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ १५० ग्रॅमची स्फोटक पावडर सापडल्याने एकच खळबळ उडाली

लखनौ : उत्तरप्रदेश विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार राम गोविंद चौधरी यांच्या आसनाजवळ १५० ग्रॅमची स्फोटक पावडर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्फोटक पीईटीएन (पेंटाएरीथ्रिटाल टेट्रा नाइट्रेट) असून ते अतिशय धोकादायक आहे. या प्रकारामुळे सभागृहाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात सांगितले की, पीईटीएन हा अतिशय धोकादायक पदार्थ आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, ५०० ग्रॅम स्फोटक हे सभागृह उडविण्यासाठी पुरेसे आहे. पीईटीएनचा समावेश प्लास्टिक स्फोटकात केला जातो. काळ्या बाजारात ते उपलब्ध होते. ते नाइट्रीग्लिसरीनसारखे असते. दहशतवादी संघटना या स्फोटकाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. कारण, ते रंगहीन असते. बहुतांश स्फोटक डिटेक्टरमध्ये मेटल डिटेक्टरचा उपयोग केला जातो. पण, पीईटीएन बंद डब्यात ठेवले जाऊ शकते. याला विजेच्या उपकरणातही ठेवले जाऊ शकते. सुरक्षा यंत्रणामधून ते सहजपणे घेऊन जाता येते. डॉग स्क्वॉडही हे स्फोटके ओळखण्यात अपयशी ठरले. ही पावडर १२ जुलै रोजी सभागृहाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सापडली. जगातील अनेक देशात पीईटीएनच्या खरेदीवर बंदी आहे. प्लास्टिक शिटच्या स्वरुपातही हे घेऊन जाता येते. सैन्य आणि खाण उद्योगात पीईटीएनचा उपयोग नियमांच्या आधारे होतो. (वृत्तसंस्था) >दहशतवादी कटाचा भाग?विधानसभेत सापडलेल्या स्फोटक प्रकरणाची राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) चौकशी करण्याची शिफारस सभागृहाने सर्वसहमतीने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ही पाऊडर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. हा अतिरेकी कटाचा भाग असू शकतो. सत्य समोर यायला हवे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही.आमदार आणि मार्शल यांच्याशिवाय कोणालाही सभागृहात येण्याची परवानगी नाही. सुरक्षा एजन्सीत समन्वयाचा अभाव असून,अतिरेकी हल्ला झाला तर सभागृहात त्याला प्रतिकार करण्याची कोणतीच यंत्रणा नाही. >काय आहे पीईटीएन? तज्ज्ञांनी सांगितले की, पीईटीएनचा (पेंटाएरीथ्रिटाल टेट्रा नाइट्रेट) थेट उपयोग स्फोटक म्हणून करता येत नाही. त्याचे स्फोटक करण्यासाठी त्याला अन्य उपकरणांची आवश्यकता असते. गत काही वर्षात पीईटीएनचा उपयोग बॉम्बस्फोटात करण्यात आला आहे. जगभरातून पीईटीएनच्या मदतीने स्फोट केल्याचे वृत्त येत असते. २०११ च्या दिल्ली उच्च न्यायालय परिसरातील स्फोटात पीईटीएनचा उपयोग करण्यात आला होता. यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. >विधानभवन उडविण्याची धमकी देणाऱ्यास अटकलखनौमधील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या फरहान अहमद या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधीक्षक चिरंजीवी सिन्हा यांनी सांगितले की, त्याच्याकडून मोबाइल व खोट्या पत्त्यावर घेतलेले सिम कार्ड जप्त करण्यात आले आहे. ६ जुलै रोजी फरहानने विधानभवन उडविण्याची धमकी दिली होती. तो देवरिया जिल्ह्यातील रामपूर कारखाना पोलीस ठाण्यांतर्गतच्या कवलाछापर गावातील रहिवासी आहे. फरहानने अपर पोलीस महासंचालक अभय प्रसाद यांना फोन करुन १५ आॅगस्ट रोजी विधानभवन उडविण्याची धमकी दिली होती.