ऑनलाइन लोकमत
केरळ, दि. ११- पुत्तिंगल मंदिराजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास संशयास्पद कार असल्याची स्थानिकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी स्फोटकांनी भरलेल्या तीन गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
पुत्तिंगल मंदिराजवळच्या 500 मीटर अंतरावरील शारकारा देवीच्या मंदिर परिसरातून या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. कालच पुत्तिंगल मंदिरातल्या आग दुर्घटनेत जवळपास 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोल्लम सिटी पोलीस कमिश्नर पी. प्रकाश यांच्या मते या गाड्या संशयास्पदरीत्या पार्क करण्यात आल्या होत्या.
स्थानिकांच्या तक्रारीवरून रविवारी रात्री त्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या गाड्यांच्या जवळ जाऊन अंदाजा घेतला त्यावेळी त्यांना गाड्यांमध्ये स्फोटकं आढळून आली. ती स्फोटकं अधिक ज्वलनशील असल्याचं प्रकाश यांनी सांगितलं आहे. कोल्लम पोलिसांनी त्या स्फोटकांनी भरलेल्या गाड्या बॉम्बनाशक पथकाच्या ताब्यात दिल्या आहे.