नवी दिल्ली : सरकारने काही निवडक पोलाद उत्पादनांच्या आयातीवर लावलेल्या रक्षात्मक कराला (सेफगार्ड ड्यूटी) मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त आयातीपासून देशांतर्गत उद्योगांचा बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र हा कर पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने कमी करून १० टक्के करण्यात येणार आहे, असा खुलासाही सरकारने केला आहे.सरकारने सर्वात अगोदर ‘रक्षात्मक कर’ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लावले होते. गेल्या महिन्यात आयातीवर किमान (कमीत कमी) मूल्य निश्चित करण्यात आले होते. चीनसारख्या देशातून ‘घुसखोरी’ रोखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला होता.