नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ‘लक्ष्य’ करणारे सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा राजन यांच्याविरुद्ध वक्तव्य दिले असून, त्यांच्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी ‘एकनिष्ठ’ असलेल्या आणखी २७ बड्या अधिकाऱ्यांना ‘एक्स्पोज’ करणार असल्याचे टिष्ट्वट केले आहे.राजन यांच्याबाबत स्वामी म्हणाले की, भाजपाची सत्ता आल्यावर राजन यांनी काँग्रेसचा एजंट म्हणून काम केले. हा संशय एकदम खरा निघाला. आता आपण लवकरच सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या २७ ‘बड्या’ अधिकाऱ्यांना ‘एक्स्पोज’ करणार आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
त्या अधिकाऱ्यांना ‘एक्स्पोज’ करणार
By admin | Published: June 20, 2016 4:50 AM